‘डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'तर्फे शहरात स्वच्छता अभियान

गांवठाण भागात देखील स्वच्छता अभियान राबवावे - आयुक्त राजेश नार्वेकर

नवी मुंबई ः महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धम्रााधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'तर्फे महास्वच्छता अभियान नवी मुंबई महापालिका परिसरातआयुक्त डॉ. राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत राबविण्यात आले.

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी  यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत ‘डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा'च्या वतीने १ मार्च रोजी  संपूर्ण भारतभरात ‘स्वच्छता अभियान'चे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई शहरात पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या
मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ‘स्वच्छता अभियान'मध्ये शहरातील हजारोहुन अधिक श्री सदस्य सहभागी झाले होते. त्यांच्या वतीने शहरातील सार्वजनिक परिसर, रुग्णालये, रस्ते, महाविद्यालये, शाळा, शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नवी मुंबई शहरातील महापालिकेच्या आठही विभागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ४३०६ श्री सदस्यांच्या श्रमदानातून स्वच्छता मोहीम पूर्ण करण्यात आली. श्री सदस्यांकडून रेल्वे स्थानक परिसर, पामबीच मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, सायन-पनवेल महामार्ग यासह नवी मंबई शहरातील २५५ किलोमीटरचा परिसर साफ करण्यात आला. यात जमा करण्यात आलेला २५.९०० टन कचरा तुर्भे येथील क्षेपणभूमीवर नेण्यात आला. यावेळी सुका कचरा उचलण्यासाठी १६ वाहनांचा वापर करण्यात आला.

‘डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'च्या राबविण्यात आलेल्या सदर स्वच्छता मोहिमेप्रसंगी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासह इतर महापालिका अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

‘डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'चा उपक्रम खूपच चांगला आहे. ‘प्रतिष्ठान'तर्फे शहरी भागात स्वच्छता अभियान राबविण्यात येते, त्याप्रमाणे गांवठाण भागात देखील स्वच्छता अभियान राबविले जावे. ‘प्रतिष्ठान'कडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. वृक्षारोपण ,स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम समाजहितकारक आहेत.-राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उपायुक्त चाबुकस्वार यांच्यासह ६ अधिकारी-कर्मचारी महापालिकेतून सेवानिवृत्त