ऐरोली येथील दत्ता मेघे महाविद्यालयात आंदोलन

दत्ता मेघे महाविद्यालयाच्या  गेट समोर  २४ व २५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय धरणे आंदोलन
 
नवी मुंबई : ऐरोली येथील सेक्टर 3 मध्ये असणाऱ्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय कडून कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सुटल्या नाहीत.म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी आठ विविध प्रकारच्या आपल्या हक्काच्या मागण्यासाठी  सहा दिवस आंदोलन करण्यात येणार आहेत.त्यातील काळया फिती लावून आंदोलन  करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व हरविंदर सिंग खालसा यांनी केले.
 
प्रोटॉन ( PROTON) या युनियन कडून अनेकदा समस्या सुटाव्यात म्हणून महाविद्यालयाला अनेकदा पत्र व्यवहार केले.त्या समस्या मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार 185% महागाई भत्ता देणे आवश्यक असताना महाविद्यालय मात्र 90%च महागाई भत्ता देत आहे.दरवर्षी वार्षिक वेतनवाढ देणे बंधनकारक असताना महाविद्यालयाने मात्र 2020-21 ची वार्षिक वेतनवाढ दिली नाही.सीएएस अंतर्गत पदोन्नती देण्यात येत नाहीत.शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किरकोळ रजा, कर्तव्य रजा, अर्जित रजा ज्या त्यांच्या हक्काच्या आहेत. त्या महाविद्यालय देत नाहीत.  लॅबोरेटरी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उन्हाळ्यात व हिवाळ्यात दीर्घ मुदतीच्या सुट्ट्या मिळाव्यात.,शिक्षकेतर कर्मचान्यांना शासनाच्या नियमानुसार 1 ते 7 दिनांक आत वेतन मिळावे, सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यॅज्युएटी मिळावे.श राजेन्द्र गायकवाड यांचे कोरोना कालखंडातील रोखलेले वेतन लवकरात लवकर  करणे आदी मागण्या आहेत.
 
भारतीय संविधानाचे कलम 16 अन्वये समान काम समान वेतन या मुलभूत अधिकाराचे हे  महाविद्यालय करीत आहे.म्हणून  20 व 21 फेब्रुवारी दरम्यान काळया फिती लावून दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये काम करण्यात आले.  22 ते 23 फेब्रुवारी रोजी आंदोलन कॉलेज लॉबी मधील लिफ्टच्या पुढे दोन दिवस 15 मिनिटे मौन आंदोलन कण्यात येईल. २४ व २५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय धरणे आंदोलन दत्ता मेघे महाविद्यालयाच्या  गेट समोर करण्यात येईल.
 
 सर्व आंदोलन हे शांततामय मार्गाने करण्यात येणार आहेत. परंतु आपली महाविद्यालाची बदनामी झाल्यास अथवा अनुचित प्रकार घडल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी संपूर्णपणे महाविद्यालयवर राहील राहील. डॉ संजय धाबर्डे,अध्यक्ष ,प्रोटान (PROTON)  महाराष्ट्र राज्य.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उलवे व विमानतळ परिसरातील सिडकोच्या जागेवर बेकायदेशीररीत्या डेब्रिज