सिडकोतर्फे हेटवणे जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मुळे काही नोडमध्ये पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद

द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील गावांतील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद

सिडकोतर्फे हेटवणे जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील गावांना होणारा पाणी पुरवठा बुधवार, दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.00 वाजेपासून ते गुरुवार, दिनांक 23 फेब्रुवारी 2023 सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

 

प्रभावित परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच पाण्याचा साठा करून, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

व्हर्टीकल गार्डनचा प्रयोग फसल्याने यापुढे शहरात व्हर्टीकल गार्डन संकल्पना बंद करण्याचा निर्णय