‘सिडको'च्या मोक्याच्या भूखंडांवर भुमाफियांचा चाळी उभारुन विकण्याचा सपाटा

‘सिडको'च्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करा; अन्यथा बेमुदत उपोषण

नवी मुंबई ः घणसोली प्रभाग क्रमांक-२९,३०,३१ आणि ३२ येथील ‘सिडको'च्या जागेवर भूमाफियांनी अनधिकृत इमले उभे केले आहेत. येथील इमारतीतील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून भूमाफिया नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आणि ‘सिडको'ने येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. अन्यथा आपण बेमुदत उपोषण करु, असा इशारा माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी दिला आहे. नवी मुंबईतील भुमाफियांनी घणसोली येथील साई सदानंद नगर आणि समर्थ नगर येथे बैठ्या चाळी जमीनदोस्त करुन त्या जागी ५ ते ६ मजली अनधिकृत इमारती उभ्या करण्याचा सपाटा लावला आहे. सदरचे मोक्याचे भूखंड ‘सिडको'च्या मालकीचे  असून त्यावर भुमाफियांनी चाळी उभ्या करुन सामान्य नागरिकांना त्या विकल्या आहेत. आता या चाळीचे रुपांतर इमारतीत करण्याचा सपाटा काही भूमाफियांनी सुरु केला आहे. सदर सर्व करीत असताना इमारतीचे बांधकाम मात्र निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप प्रशांत पाटील यांनी केला आहे.

भविष्यात याठिकाणी कधीही एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सदर अनधिकृत इमारतींवर महाालिका आणि सिडको यांनी संयुक्त कारवाई करावी, याबाबत प्रशांत पाटील यांनी वारंवार ‘सिडको'चे व्यवस्थापक संचालक, नवी मुंबई
महापालिका आयुक्त, महापालिका अतिक्रमण विभाग, घणसोली एफ विभाग सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार करुन ‘सिडको'च्या भूखंडावरील अतिक्रमण निष्कासित करण्याची मागणी केली आहे. मात्र, सदर पत्राची सिडको, नवी मुंबई महापालिका यांनी कोणतीच दखल न घ्ोतल्याने नाईलाजास्तव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्रव्यवहार करुन प्रशांत पाटील यांनी कारवाईसाठी साकडे घातले आहे.

घणसोली प्रभाग क्र.३१,३२ आणि अन्य प्रभागात विकासक बैठ्या चाळीतील  नागरिकांना आमिषे दाखवून निकृष्ट दर्जाच्या ५ ते ६  मजली इमारती महापालिका, सिडको यांची कुठलीही परवानगी न घ्ोता उभारुन त्या गरीबांना
विकत आहेत. अतिक्रमण व्ोÀलेले भूखंड ‘सिडको'च्या मालकीचे आहेत. जर एखादी दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी अग्निशनदल किंवा रुग्णवाहिका देखील पोहचू शकत नाही अशी बिकट अवस्था झाली आहे. मात्र, या अनधिकृत बांधकामांकडे सिडको आणि महापालिकेचे अतिक्रमण विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असून भुमाफियांना सिडको आणि महापालिका यांच्या कडून पाठबळ मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना वारंवार अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याने लवकरच घणसोली विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहे, असे प्रशांत पाटील यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोतर्फे हेटवणे जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मुळे काही नोडमध्ये पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद