रस्त्यावर पथदिवे नसल्याने सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावरच अंधार पडत असल्याच्या समस्येतून मुक्तता

 रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नांमुळे गृहनिर्माण सोसायट्यांसमोरील अंधार संपुष्ठात
 

नवी मुंबई ः रस्त्यावर पथदिवे नसल्याने सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावरच अंधार पडत असल्याच्या समस्येतून जुईनगर, सेक्टर-२४ मधील गृहनिर्माण रहिवाशांची ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या माध्यमातून कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. यांसदर्भात येथील स्थानिक रहिवाशांना रविंद्र सावंत यांचे सदर समस्येकडे लक्ष वेधले असता सावंत यांनी तात्काळ महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून नवीन पथदिव्यांची सोय करुन दिली. जुईनगर, सेक्टर-२४ मधील ओमकार आणि पंचरत्न सोसायटीतील रहिवाशांनी त्यांच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारालगत पथदिवे नसल्याने अंधारामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची रविंद्र सावंत यांच्यासमोर व्यथा मांडत लवकरात लवकर या समस्येचे निवारण करण्याचे साकडे रविंद्र सावंत यांना घातले होते. मुख्य रस्त्यावर पथदिवे होते; पण अंर्तगत रस्त्यावर दिवे नसल्याने अंधाराचा त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत होता. त्यामुळे ‘काँग्रेस'चे जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे या समस्येविषयी तक्रार करतानाच संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घ्ोऊन सदर समस्येचे गांभीर्य आणि स्थानिक रहीवाशांची होत असलेली गैरसोय संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले.

यानंतर तातडीने महापालिका प्रशासनाने ओमकार आणि पंचरत्न गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराजवळ नवीन पथदिवे लावत अंधाराची समस्या संपुष्ठात आणली. या पथदिव्याचे उद्‌घाटन रविंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रहिवाशांनी रविंद्र सावंत यांचे आभार मानले. याप्रसंगी समाजसेवक विनायक चौगुले, शिवाजी सावले, दादा बोरकर, राजाराम शिंगाडे, बच्चाराम मगदुम, नितिन काजवे, रमेश मांडके, अनिल कदम, मंदार घुगरे, प्रमोद तरडे, लालू ननावरे, प्रभुदास मात्रे, बाळू पवार, रविंद्र बाबर, गौरी, मनोहर बंडगर यांच्यासह स्थानिक गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या मोक्याच्या भूखंडांवर भुमाफियांचा चाळी उभारुन विकण्याचा सपाटा