लोकल प्रवासी संघटनांकडून साखळी उपोषणात सहभागी हाेण्याचे आवाहन

 लोकलच्या विलंबाचा प्रवासी संघटनांकडून २१ फेब्रुवारीला साखळी उपोषणाद्वारे निषेध

ठाणे -ः रेल्वे प्रशासनाने स्वतः तयार केलेले रेल्वेचे वेळापत्रक किमान पाळण्यात यावे. तसेच पाचव्या-सहाव्या मार्गिकांचा फायदा सामन्यांना होईल असे नियोजन करुन लोक गाड्यांची संख्या वाढवाव्या असे सर्व प्रवाशांचे मत आहे. सर्व फलाटांवर महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करा. सॅनिटरी नॅपकिन वेडिंंग मशिन्स उपल्ध व्हाव्यात, प्रवाशांसाठी उपलब्ध स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता तसेच २४ तास चालू ठेवण्यात यावेत. फलाट, पादचारी पूल यावरील रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांची संख्या वाढवून तेथील फेरीवाले, भिकारी, गदर्ूल्ले यांना हटवून महिला प्रवाशांमधील दहशत दूर करण्यात यावी. महिलांच्या डब्ब्यात महिला पोलीस तैनात करण्यात यावा. अशा विविध मागण्यासाठी ठाणे-कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे प्रवासी संघटनांच्यावतीने मंगळवारी २१ फेब्रुवारी पासून कल्याण रेल्वे स्थानकात सनदशीर मार्गाने साखळी उपोषण करणार आहेत. रेल्वे प्रशासना विरुद्ध असंतोष या आंदोनातून दाखवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात येणार आहे. 

ठाणे, कल्याण, कर्जत आणि कसारादरम्यान रेल्वे प्रवाशांच्या मुलभूत सुविधा आणि सुरक्षेसाठी ही रेल्वे प्रवासी संघटना कार्यरत आहेत. रेल्वे प्रवाशांच्या निरनिराळया समस्यांवर संघटनेकडून विभगीय रेल्वे व्यवस्थापक, वाणिज्य, अभियांत्रिकी, रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे लोहमार्ग पोलिस, स्थानक प्रबंधक या सर्वांना सातत्याने पाठवून पत्र व्यवहार करुन त्यावर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु प्रशासनाकडून या समस्यांचे सकारात्मक निराकरण होत नसून प्रशासनातील गोंधळ यामुळे चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आपल्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याच्यादृष्टीने मंगळवार २१ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत कल्याण रेल्वे स्थानकात साखळी उपोषणाचे आयोजन करुन त्याद्वारे रेल्वे प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न संघटनेकडून करण्यात येत आहे. तरी या मार्गावरील जास्तीत जास्त प्रवाशांनी या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती संघटनांतर्फे करण्यात येत आहे.

कल्याण-कसारा-कर्जत भागातून सुमारे १० ते १५ लाख प्रवासी प्रवास करत असले तरी त्यांच्या समस्यांची दखल येथील स्थानिक खासदार, आमदारांकडूनही घेतली जात नाही. रेल्वे प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे स्थानकांची दुरवस्था होत आहे. नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना यामुळे मोठा मनस्थाप सहन करावा लागत असून त्यांच्या वेदना प्रशासनापर्यंत पोहचवण्याचा प्रचत्न या आंदोलनातून केला जाणार असल्याचे म्हणले जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

के.बी.पी.कॉलेज येथे शिवजन्मोत्सव सप्ताह निमित्ताने शिवव्याख्या संपन्न