परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांच्या हस्ते वाहकांचा सत्कार

‘एनएमएमटी'मध्ये ‘फोन-पे'द्वारे कॅशलेस तिकीट वितरण

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसेसमधून प्रवास करताना प्रवाशांनी तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी कॅशलेस व्यवहारासाठी फोन-पे, क्युआर कोड स्कॅनिंग तसेच एनएमएमटी बस ट्रॅकर ॲपद्वारे तिकीट बुकींग आणि ऑनलाईन बसपास यांच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने परिवहन उपक्रमाच्या प्रवाशांकडून जास्तीत जास्त फोन-पे ॲपद्वारे ऑनलाईन पध्दतीने कॅशलेस तिकीट विक्रीची रक्कम स्विकारुन सदरची रक्कम उपक्रमाकडे जमा करणाऱ्या वाहकांचा नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बेलापूर भवन मधील मुख्यालय येथे १६ फेब्रुवारी रोजी व्यवस्थापक योगेश कडुसकर यांच्या हस्ते गुणगौरव आणि सत्कार करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘एनएमएमटी' प्रवासी सेवेसाठी कॅशलेस पेमेंट पध्दतीचा वापर जास्तीत जास्त करावा, असे अवाहन परिवहन उपक्रमामार्फत प्रवाशांना करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल पालिकेचा पाणीपुरवठा आणि मल:निसारणाचा प्रश्न सुटणार