‘उत्क्रांतीतून मानवाची निर्मिती झाली हे पुराव्याने सिध्द'

चार्ल्स डार्विन यांचा जन्म दिवस विचारमंथनाने साजरा

नवी मुंबई ः  कोपरखैरणे सेक्टर ४ मधील आदित्य विला येथे मानवाचा उत्क्रांतीवाद या विषयावर १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती आयोजित व्याख्यान पार पडले. माजी आयकर आयुक्त  अरविंद सोनटक्के यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

मानवाने उत्क्रांती सिध्दांत समजून घेतला तर धर्माचा कालबाह्यपणा समजून येईल. समाज अमानवीय शक्तीच्या जोखडातून मुक्त होऊन विवेकी होईल. टोकदार झालेल्या धार्मिक अस्मितांना रोखण्यासाठी आपल्या देशात चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांती सिध्दांताचा प्रचार व प्रसार केला पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला.  जगातील सर्व धर्म मानवाची निर्मिती त्या-त्या धर्मातील देवाने केली आहे किंवा कोणत्यातरी अदभुत शक्तीने केली आहे असे मानतात. धर्मग्रंथात लिहिले आहे असे सांगत विज्ञानाच्या कसोटीवर टिकेल असा एकही पुरावा धर्म सादर करत नाहीत. चार्ल्स डार्विन यांनी इ. स. १८३१ ते इ. स. १८३६ या कालावधीत पृथ्वी प्रदक्षिणा करुन विविध प्राचीन अवशेष गोळा केले व त्यांचा अभ्यास केला. आलेल्या निष्कर्षावर विविध तज्ञांशी पत्रव्यवहार करून पडताळा घ्ोत त्यांनी सर्वप्रथम मानवी उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडून त्याचे पुराव्यानिशी समर्थन केले. जगभरातील शास्त्रज्ञांनी मानवाचा जन्म उत्क्रांतीतून झाला आहे हा सिद्धांत मान्य केला आहे.  


सदर कार्यक्रमाला महा. अंनिसचे राज्य सरचिटणीस विजय परब, महा. अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते नरेंद्र राणे उपस्थित होते.जयश्री कोकाटे, इच्छा कोकाटे, तन्मय कोकाटे, पवन कोकाटे, कमेश कांबळे, उदय मोहिते, साई सणस, श्रीधर गावडे, राजू जाधव, औदुंबर बोबडे, राजेंद्र पंडित, गजानंद जाधव, पांडुरंग सरोदे, अशोक निकम यांनीही सक्रिय उपस्थिती दर्शवली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांच्या हस्ते वाहकांचा सत्कार