ऑटिस्टिक (स्वमग्न) विद्यार्थी-पालक रंगले नृत्यात!

‘चाईल्ड रिॲक्ट फाऊंडेशन'च्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त अंतरीक्ष महोत्सवाचे नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन येथे आयोजन

नवी मुंबई ः ऑटीझम आणि शैक्षणिक अक्षमता यामुळे लहान मुले आणि शालेय विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांना भेडसावणाऱ्या विविध मानसिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन, उपचार करणाऱ्या ‘चाईल्ड रिॲक्ट फाऊंडेशन'च्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त अंतरीक्ष या आगळ्या-वेगळ्या महोत्सवाचे नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑटीझममुळे (स्वमग्नता) किंवा अध्ययनविषयक अक्षमतेमुळे शाळेत किंवा समाजातही पुरेशा आत्मविश्वासाअभावी चाचरत वावरणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करुन सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल या परिसरातील २००हुन अधिक स्वमग्न विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी अंतरीक्ष महोत्सवात सहभाग घेऊन विविध कार्यक्रम सादर केले. एका विशिष्ट अक्षमतेमुळे प्रतिवुÀलतेशी सामना करावा लागणाऱ्या या विद्यार्थी, पालकांचे मनोबल उंचावण्यासाठी रोटरी क्लबचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, ‘चाईल्ड रिॲक्ट फाऊंडेशन'चे संस्थापक आणि  ओक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंद शिक्षक आवजन उपस्थित होते.

यावेळी  ‘चाईल्ड रिॲक्ट फाऊंडेशन'च्या वतीने ओक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओ थेरपिस्ट अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘उत्क्रांतीतून मानवाची निर्मिती झाली हे पुराव्याने सिध्द'