विहित काळात विकासकाकडून कन्व्हेयन्स डीड प्रक्रिया पूर्ण

कपीला, नंदना गृहनिर्माण सोसायटी मधील रहिवाशांना दिलासा

नवी मुंबई ः सोसायटी रजिस्ट्रेशननंतर ‘रेरा'च्या नियमानुसार ठराविक मुदतीत बिल्डरांनी कन्व्हेयन्स डीड अर्थात अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करुन देणे गरजेचे असते. हिच बाब लक्षात ठेवून ‘साई डेव्हलपर्स'चे भागीदार सुरेश पाटकर, विजय कडू, नलिन शर्मा यांनी तळोजा सेवटर-१० मधील (प्लॉट नंबर-१०) कपीला गृहनिर्माण सोसायटी या ७ मजली रहिवाशी इमारत आणि रोडपाली कळंबोली सेवटर-१७ मधील (प्लॉट नंबर-२१) नंदना गृहनिर्माण संस्था,या ४ मजली रहिवाशी इमारत मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना एकाच दिवशी कन्व्हेयन्स डीड आणि सोसायटी हॅण्डओव्हर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या जलद प्रक्रियेमुळे कपीला आणि नंदना गृहनिर्माण सोसायटी मधील सभासदांना जागेचा मालकी हक्क प्राप्त झाला असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, कपीला आणि नंदना गृहनिर्माण सोसायटी मधील रहिवाशांनी याबाबत विकासकांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत कायदा (रेरा) या कायद्याच्या आधारे इमारतीच्या जमिनीची अभिहस्तांतरण प्रक्रिया (कन्व्हेयन्स डीड) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकाराद्वारे सदनिकाधारकांच्या संस्थेच्या नावावर मालमत्ता हस्तांतरण होते. त्यामुळे संस्थेच्या सभासदांना जागेचा मालकी हक्क प्राप्त होतो. सोसायटी रजिस्ट्रेशन नंतर मुदतीत बिल्डरांनी अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. त्यानुसार ‘साई डेव्हलपर्स' विकासकाने सदर प्रक्रिया विहित काळात पूर्ण केली असून, ‘साई डेव्हलपर्स'चे भागीदार विजय कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासदांना प्रमाणपत्र हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी बांधकाम व्यावसायिक विजय कडू यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या झालेल्या पहिल्या सभेत सोसायटी मधील बहुतांश घरमालक उपस्थित होते. यावेळी ‘कपीला गृहनिर्माण संस्था'चे अध्यक्ष रियाज अहमद खान, सचिव राकेश कुमार मिश्रा, खजिनदार बाजीराव लोटे आणि ‘नंदना गृहनिर्माण संस्था'चे अध्यक्ष विजय करंदकर, सचिव संदीप शिर्के, खजिनदार प्रमोद काशीद तसेच सदस्य उपस्थित होते. दरम्यान, ‘साई डेव्हलपर्स'ने आतापर्यंत ८७ सोसायटी बनवल्या असून, भविष्यातही चेंबूर, वाशी, नेरुळ, बेलापूर, तळोजा, नेरळ, कर्जत मध्ये नवीन गृहप्रकल्प निर्माण करण्यात येणार आहेत.

कोणत्याही प्रोजेक्टमध्ये लोकांनी घर घ्ोताना जमापुंजी एक करुन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असते. त्यामुळे लोकांना वेळेत कन्व्हेयन्स डीड करुन देणे प्रत्येक विकासकाचे कर्तव्य असून, कपीला आणि नंदना गृहनिर्माण संस्था या प्रोजेक्टमध्ये पंतप्रधान आवास योजना राबवली. यामध्ये वन आरके, वन बीएचके, टू बीएचके रुमचा समावेश आहे. दोन्ही गृहनिर्माण सोसायटी मध्ये नामांकीत कपंनीची लिपट, सोसायटी कार्यालय, रहिवाशी पार्किंग, व्हिजिटर पार्किंग, जेनरेटर बॅकअप आदी सुविधा देण्यात आल्या असून, दोन्ही गृहनिर्माण संस्थाना कोविड-१९काळात भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे, असे विजय कडू यांनी सांगितले.

दरम्यान, नवी मुंबईसह मुंबईतील बहुतांश ठिकाणच्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये कन्व्हेयन्स डीड प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, कमी वेळेत पजेशन मिळाल्यानंतर आमच्या सोसायटीत ‘साई डेव्हलपर्स'ने कन्व्हेयन्स डीड प्रक्रिया पूर्ण करुन सोसायटी मधील रहिवाशांना सुरक्षितता देणे आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे, अशी भावना ‘कपीला गृहनिर्माण संस्था'चे अध्यक्ष रियाज अहमद खान आणि ‘नंदना गृहनिर्माण संस्था'चे अध्यक्ष विजय करंदकर यांच्यासह इतर असंख्य रहिवाशांनी यावेळी व्यक्त केल्या. याप्रसंगी संतोष घाडगे, आनंद अंचन यांच्यासह सोसायटी मधील रहिवाशी आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट'च्या मागणीला अखेर यश