कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी

 जिल्हास्तरीय सॉपट बॉल टेनिस स्पर्धेत राज शिंदे याला सुवर्ण पदक

वाशी ः वाशी मधील सेंट मेरी मल्टी पर्पज स्वूÀल मध्ये दहावी मध्ये शिकत असलेल्या राज संजय शिंदे याने जिल्हा स्तरीय आणि  विभागीय शालेय सॉपट बॉल टेनिस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे.


क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि जिल्हा क्रीडा परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच शालेय सॉपट बॉल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज शिंदे याने सुवर्ण पदक पटकावले. राज शिंदे याने स्पर्धेत केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल स्वूÀलच्या वार्षिक स्नेह संमेलनात त्याचा सत्कार करण्यात आला. सदर कामगिरीमुळे राज शिंदे आता कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार असून, शाळेतील सृष्टी धुरी (आठवी) आणि कैनाथ पावने (नववी) देखील त्याच्या सोबत स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी