वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने दंड

खारघर वाहतूक पोलिसांकडून एकाच दिवशी ५० इको वाहनावर  कारवाई

खारघर ः परवाना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि  वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ५० वाहनांवर खारघर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याने इको वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.
तळोजा फेज-२ वसाहतीत मोठया प्रमाणात बांधकाम सुरु आहे. तर तळोजा गाव, तळोजा वसाहत आणि पापडीचा पाडा परिसरात वास्तव्य करणारे नागरिक खारघर येथून रेल्वेने प्रवास करीत करतात. मात्र, खारघर रेल्वे स्थानकावर नवी मुंबई महापालिका परिवहन उपव्रÀम द्वारे एनएमएमटी बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे तळोजा आणि काही बाहेरील वाहन चालकांची तळोजा येथील शीघ्र कृती दल ते बेलपाडा खारघर मार्गांवर मोठया प्रमाणात इको प्रवासी वाहने सुरु आहेत. या इको वाहनात सहा प्रवाशांना वाहन परवाना असताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करीत असल्याचे तसेच बेलपाडा गाव मेट्रो पुलाखाली आणि शीघ्र कृती दल सिग्नल यंत्रणा समोरील रस्त्यावर वाहने उभी करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी मोहीम हाती घ्ोवून बेलपाडा आणि शीघ्र कृती दल येथील इको टॅक्सी स्टँडवर पथक पाठवून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई केली. एकाच दिवशी आणि अचानक केलेल्या कारवाईमुळे वाहन चालकांनी एकत्र येवून वाहतूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी इको चालकांची मनमानी, दादागिरी आणि बेशिस्त यापुढे खपवून घ्ोतली जाणार  येणार नाही, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्याने इको वाहन चालक शांत झाले.

तळोजा शीघ्र कृती दल ते खारघर, बेलपाडा दरम्यान मोठ्या प्रमाणात इको वाहने सुरु आहेत. सदर वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच ५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तळोजा शीघ्र कृती दल आणि बेलपाडा येथील इको स्टॅन्ड येथील रस्त्यावर वाहने उभी करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कारवाई सुरु राहणार आहे. - योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - खारघर वाहतूक शाखा.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी