१६ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी  या कालावधीचा प्रतिदिन ५०/- रुपये दंड

टॅक्सी, ऑटोरिक्षा भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

ठाणे ः मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी यांचे भाडेदर सुधारणा लागू झाली आहे. त्याअनुषंगाने ऑटोरिक्षा परवानाधारकांनी भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन करण्यासाठी १५ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु आता त्यास मुदतवाढ देण्यात आली असून, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी मिटर यांचे रिकॅलीब्रेशन करण्याकरिता ३१ मार्च २०२३ रोजी पर्यंत ऑटोरिक्षा परवानाधारक आणि सर्व ऑटोरिक्षा संघटना यांनी विहित मुदतीत मीटर रिकॅलिब्रेशन करुन घ्यावे, असे आवाहन ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, विहित मुदतीत (१५ जानेवारी २०२३ पर्यंत) मिटर रिकॅलीब्रेशन न केल्याबद्दल १६ जानेवारी २०२३ ते ०३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीचा प्रतिदिन ५०/- रुपये इतका दंड लागू असून, ०४ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीसाठी दंड लागू राहणार नाही, असे ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेने मालमत्ता कर, पाणीपट्टी वाढवू नये -आ.गणेश नाईक