सतीश यादव ‘महापालिका क्षेत्र श्री'चा मानकरी

रसेल दिब्रेटो राज्यस्तरीय ‘नवी मुंबई महापालिका श्री'चा मानकरी 

नवी मुंबई ः राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या विविध वजनी गटाच्या १५७ शरीरसौष्ठवपटुंमधून मुंबईच्या रसेल दिब्रेटो यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत सव्वा लाख रुपये बक्षिस रक्कमेसह नवी मुंबई महापालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू-२०२३ किताबासह मानाचा चषक स्विकारला.

कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकर यांनी ४५ हजार पारितोषिक रक्कमेसह राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकाविले. तरनवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री-२०२३ या नवी मुंबई महापालिका स्तरीय स्पर्धेत सहभागी ६९ स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटुचे विजेतेपद ५० हजाराची पारितोषिक रक्कम आणि मानाच्या चषकासहीत ऐरोली येथील सतीश यादव यांनी पटकाविले. वाशी मधील महेद्र शेडगे यांनी महापालिका क्षेत्र श्री स्पर्धेचे उपविजेतेपद २५ हजार रक्कमेसह संपादन केले. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या चंद्रशेखर पवार यांनी बेस्ट पोझर तसेच ठाण्याच्या सुदर्शन खेडेकर यांनी मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर किताब पटकाविला. या दोघानांही प्रत्येकी १५ हजार रुपये रक्कमेची पारितोषिके प्रशस्ती पत्रासह प्रदान करण्यात आली. नवी मुंबई महापालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आणि नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर विष्णुदास भावे नाट्यगृहात ७ फेब्रुवारी रोजी जल्लोषात संपन्न झाल्या.

२२५ हून अधिक शरीरसौष्ठवपटुंच्या सहभागातून यशस्वी झालेल्या या राज्यस्तरीय शसीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले, क्रीडा- सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, डॉ. श्रीराम पवार, अनंत जाधव, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, आदि उपस्थित होते. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी माजी खासदार तथा ‘नवी मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशन'चे अध्यक्ष संजीव नाईक, उपायुक्त सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ‘महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन'चे सचिव ॲड. विक्रम रोटे, ‘ग्रेटर मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशन'चे महासचिव नंदकुमार खानविलकर, ‘ठाणे बॉडी बिल्डींग असोसिएशन'चे सचिव राजेंद्र चव्हाण, ‘नवी मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशन'चे सचिव हेमंत खेबडे, आदि उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ५५,६०,६५,७०,७५,८०,८५ किलोपर्यंत आणि ८५ किलोवरील अशा ८ वजनी गटामध्ये तर महापालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा ५०,५५,६०,६५,७० किलोपर्यंत आणि ७० किलोवरील अशा ६ वजनी गटांमध्ये घेण्यात आली. या प्रत्येक वजनी गटातील ६ विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून भव्य ‘महाराष्ट्र जत्रोत्सव' ला प्रारंभ