सानपाडा पामबीच येथील भुयारी मार्गाचे काम त्वरित हाती घ्यावे

सानपाडा येथील भुयारी मार्गाचे काम नवी मुंबई महापालिका प्रशासनाने त्वरित चालू करावे -  पामबीच (सोनखार) जेष्ठ नागरिक सेवा समिती

नवी मुंबई : संभाव्य  जीवित हानी वाचवण्यासाठी सानपाडा येथील भुयारी मार्गाचे काम त्वरित नवी मुंबई महापालिका प्रशासनाने त्वरित  चालू करावे अशी मागणी पामबीच (सोनखार) जेष्ठ नागरिक सेवा समितीने केली आहे.

वाहतूक कोंडीत प्राणास मुकलेल्यांना जीवदान देणे शक्य नाही . परंतु सदर जीवदान देण्यासाठी विकास महत्वाचे आहे. म्हणून महानगरपालिका प्रशासनाने विलंब न करता सानपाडा सेक्टर १९ येथील केसर सॉलीटर इमारत जवळ पामबीच मार्गावर नवीन भुयारी मार्ग तयार करण्याच्या कामाची निविदा नवी मुंबई महापालिकेने ३ नोव्हेंबर २०२१  रोजी निविदा प्रसिद्ध केली. आजमितीस सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश प्रतिक्षेत असून ते पूर्ण करावे. सदर भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी गेले ५ वर्ष भाजपचे  नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते  दशरथ भगत, निशांत भगत, माजी नगरसेविका वैजयंती दशरथ भगत व रुपाली निशांत भगत सातत्याने पाठपुरावा करत आहेत, अस जेष्ठ नागरिक सेवा समितीने पत्रात म्हटले आहे.

सानपाडा से. १ व १३ ते २० या क्षेत्रासाठी मोराज रेसिडेन्सी समोर एकमेव प्रवेश ठिकाण आणि  बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तसेच सानपाडा से. २ ते १० या क्षेत्रातील नागरीकांना मुंबई व वाशीच्या दिशेने त्वरित प्रवेश करण्यासाठी मोराज सोसायटी समोरील शारदामाई नानासाहेब धर्माधिकारी चौकातच यावे लागते.

  सदर चौकात सततच्या वाहतूक कोंडीमुळे  अनेकवेळा सानपाडा नोड मधील रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि  आपत्कालीन  परिस्थीतीत अग्निशमन दलाची वाहने अडकुन जीवितहानी झाली आहे.  सदर जीवितहानी होऊ नये, म्हणुन नवीन भुयारी मार्ग करण्याची मागणी मागील पाच वर्षांपासून होत आहे. तसेच आजमितीस सदर चौकाचे कॉंक्रेटीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे दिवसभर ट्रॅफिक जाम होत आहे.

तरी नवी मुंबई मनपा प्रशासनाने सेक्टर १९ केसर सॉलीटर इमारत जवळ पामबीच मार्गाखालीलील ज्या भुयारी मार्गाच्या कामाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ते काम  त्वरित चालू करुन जीवितहानी वाचवावी,अशी मागणी पामबीच (सोनखार) जेष्ठ नागरिक सेवा समितीचे अध्यक्ष देवेन्द्र खाडे, सचिव चंद्रकांत काळे यांनी मनपा प्रशासनास केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सतीश यादव ‘महापालिका क्षेत्र श्री'चा मानकरी