नवी मुंबई शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशाचा पुन्हा एकदा चुराडा

‘एलइडी कर्बस्टोन'चा प्रयोग फोल ?

वाशी ः स्वच्छ भारत अभियान-२०२२ अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबई शहरातील चौका-चौकात एलइडी कर्बस्टोन ( रंगीत ठोकले ) बसवले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यातच सदर कर्बस्टोन रस्त्यावरुन गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशाचा पुन्हा एकदा चुराडा झाल्याचे स्पष्ट होत आहे.

स्वच्छ भारत अभियान मध्ये नवी मुंबई महानगरपालिका दरवषी दौलत जादा करत खर्च करत असते. महापालिका दरवर्षी भिंती रंगविण्यात करोडो रुपये खर्च करते. त्यासोबतच व्हर्टीकल गार्डन, शिल्प, टाकावू पासून टिकावू, कविताच्या भिंती, अशा नवनवीन संकल्पना महापालिका राबवित आली आहे. २०२१ साली नवी मुंबई शहरात महापालिकेने मोठ्या प्रमाणात बसवलेले कारंजे आजही पाण्यासाठी आसुसलेले आहेत. २०२२ मध्ये पलेमिंगो सिटी संकल्पना अंतर्गत महापालिव्ोÀने बसविलेले कृत्रिम पलेमिंगो एका उन्हाळ्यात सफेद पडले. यात आणखी भर म्हणून २०२२ मध्ये विद्युत विभागामार्फत एलइडी कर्बस्टोन संकल्पना राबवण्यात आली.

रात्रीच्या वेळी रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता होणारे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एलइडी कर्बस्टोन पध्दत वापरली जाते. त्या धर्तीवर नी मुंबई शहरातील चौका-चौकात एलइडी कर्बस्टोन बसवून एक नवीन प्रयोग करण्यात आला. मात्र, अवघ्या सहा महिन्यातच एलइडी कर्बस्टोन प्रयोग फोल ठरला असून, नवी मुंबई शहरातील कर्बस्टोन गायब झाले आहेत. एलइडी कर्बस्टोन गायब झालेल्या नवी मुंबई शहरातील चौकांना पुन्हा रंगवण्याचे काम यंदा महापालिका द्वारे हाती घ्ोण्यात आले, असून रेडियम पट्टीची आणखी एक नवीन संकल्पना राबवण्यात आली आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिका करीत असलेले प्रयोग फोल ठरत असल्याने नवी मुंबई मधील नागरिकांच्या पैशाचा चुराडा होत असल्याचे उघड होत आहे. याबाबत विद्युत विभागाकडून तपशीलवार माहिती मागितली असता, वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनातर्फे एलइडी कर्बस्टोन पध्दतीवर किती खर्च करण्यात आला ते अजून अनुत्तरित आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिलेंडर बाटला पासिंगच्या नावाखाली वाहन चालकांची लूट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी