‘एमआयडीसी'कडून उद्यानाच्या भूखंडाची विक्री

उद्यानाच्या भूखंडाची ‘एमआयडीसी'ने विक्री केल्यामुळे संबंधित भूखंडावर ‘शिवसेना'च्या पदाधिकाऱ्यांची तातडीने धाव

नवी मुंबई ः एमआयडीसी कार्यक्षेत्रामध्ये महापालिकेने वसविलेल्या उद्यानाच्या भूखंडाची ‘एमआयडीसी'ने विक्री केल्यामुळे उद्यान वाचवण्यासाठी ‘शिवसेना'च्या पदाधिकाऱ्यांनी  संबंधित भूखंडावर तातडीने धाव घेऊन तेथे सुरु असलेले काम बंद केले. तसेच यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना देखील तेथे बोलावण्यात आले होते. २६ जुलै २००१ रोजी ‘एमआयडीसी'ने नवी मुंबई महापालिकेला वृक्ष लावण्यासाठी त्याचप्रमाणे उद्यानासाठी एमआयडीसी कार्यक्षेत्र मधील काही भूखंड हस्तांतरीत केले होते. त्यापैकी एका भूखंडावर महापालिकेने इंदिरानगर येथे शांताबाई सुतार उद्यान तयार केले होते. ६ फेब्रुवारी २०२३ या भूखंडावर बांधकाम सदृश्य कामे सुरु झाल्याचे निदर्शनास येताच विभागातील नागरिकांनी  शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन सदर प्रकार निदर्शनास आणला. यानंतर ‘शिवसेना'च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वस्तुस्थिती पाहिली आणि लगेचच महापालिकेचे विभाग अधिकारी आणि सर्व संबंधित यंत्रणांना त्याबाबत कळविले. त्यानुसार महापालिकेने सदर विषय गांभीर्याने घेऊन त्वरित संंबंधित काम थांबविण्याचे आदेश दिले.

 यानंतर ‘शिवसेना'च्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात विस्तृत निवेदन दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपशहरप्रमुख महेश कोटीवाले, विनोद मुके, विभागप्रमुख समीर बागवान, बाळकृष्ण खोपडे, प्रेमराज जाधव, उपविभाग प्रमुख किशोर लोंढे, शाखाप्रमुख अशोक भामरे, महेश हलवाई, जहागीर शेख, आदि पदाधिकारी उपस्थित होते. याच विषयाच्या अनुषंगाने एमआयडीसी वर शिवसेना जिल्हाप्रमुख वि्ील मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज ७ फेब्रुवारी रोजी धडक आंदोलन करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ