भूमिपुत्र सोहळ्यासाठी परिश्रम घेतलेल्यांचा सन्मान
नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार
नवी मुंबई ः लोकनेते दि.बा.पाटील ह्यांच्या जयंती निमित्त दिनांक १३ जानेवारी रोजी झालेल्या भव्य भूमिपूत्र सोहळ्यासाठी मेहनत घ्ोतलेल्या हातांचे, दिबांचे विचार त्यांचे संस्कार जनसामान्यांमध्ये पोहचावे आणि त्यातून समाज हित साधले जावे म्हणून निस्वार्थपणे झटणाऱ्या नवी मुंबईतील गावपातळीवरील दिवा कोळीवाडा, राबाडा कोळीवाडा, गोठीवली, तळवली, घणसोली, बोनकोडे, जुहूगाव, शिरवणे, नेरुळ, दारावे आणि दिवाळे गावातील उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांचा आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने दिबा योद्धा सन्मान कोपरखैरणे येथील शेतकरी समाजमंदिरातील एका विशेष कार्यक्रमात करण्यात आला.
कार्यक्रमात पुढे मुंबई महानगर प्रदेशातील भूमीपुत्रांसमोर, विशेषकरून नवी मुंबईतील भूमीपुत्रांच्या पुढे असणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक आव्हानांबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी गरजेपोटी घरे नियमितीकरण, भूमिपुत्रांना शासकीय/खाजगी नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देणे, भूमिपुत्रांना उद्योजकतेच्या संधी निर्माण करून देणे, महिला सक्षमीकरण आदि विषयांवर विचारमंथनात उपस्थितांनी आपली मते मांडली. काही कारणांमुळे सदर आणि उर्वारित गावांमधले दिबा योद्धे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांना त्यांच्या गावात जाऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे ह्यावेळी स्पष्ट करण्यात आले.