नवी मुंबईकर जादूगाराचा आंतरराष्ट्रीय ऑनलाईन जादू स्पर्धेत सात देशांत दुसरा क्रमांक

नेरुळचे जादूगार सोनावणे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुसरे

नवी मुंबई : युनायटेड स्टेट्‌स, मेक्सीको, अल्जेरिया, भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश अशा सात देशांतील सुमारे ५० जादुगारांनी सहभाग घेतलेल्या वर्ल्ड क्लास ऑनलाईन इंटरनॅशनल मॅजिक कॉम्पिटिशन मध्ये नेरुळ येथील जादूगार योगेश सोनावणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

जागतिक शांततेसाठी जादू हे घोषवाक्य समोर ठेवत दि इंटरनॅशनल ब्रदरहूड ऑफ मॅजिशियन्सच्या विद्यमाने जुलै २०२० पासून अशा प्रकारच्या जादूगारांच्या ऑनलाईन इंटरनॅशनल स्पर्धा दर महिन्याला भरवल्या जात असतात. जानेवारी २०२३ च्या स्पर्धेत सोनावणे यांना द्वितीय क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात आले. सदर स्पर्धेचे परिक्षक म्हणून विविध देशांमधील नामांकित जादूगारांनी काम पाहिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उद्यानांच्या देखभाल-दुरुस्ती होण्यासाठी दशरथ भगत यांचा जनआंदोलनाचा इशारा