राज्य शासनाकडून 10 कोटींची विशेष तरतूद - आ.सौ.मंदाताई म्हात्रे
दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेजच्या अंतर्गत संपूर्ण गावात सोलर सिस्टमचे जाळे
नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजनेच्या अंतर्गत आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले असून नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून "दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेज" च्या अंतर्गत संपूर्ण दिवाळे गावात सोलर सिस्टमचे जाळे, हायमास्ट व स्ट्रीटलाईट बसवणेकरिता राज्य शासनाकडून 10 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली. त्यामुळे दिवाळे गाव हे नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज होण्याची वाटचाल अजून पुढे सुरू राहणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
स्मार्ट व्हिलेज अंतर्गत भव्य, सुसज्ज सर्व सुविधांयुक्त मच्छी मार्केट, फ्लेमिंगो उद्यान, मासे सुकविण्यासाठी प्लॅटफॉर्म, भव्य वाहनतळ उभारण्यात आले आहे. रिंगरोडचे काम अंतिम टप्प्यात आहे. चिकन व मटण मार्केट उभारणे, फळ व भाजी मार्केट उभारणे, गजेबो गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, मासळी मार्केट मागील बाजूस वाहनतळ उभारणे या कामांचे भूमिपूजन सोमवारी करण्यात येणार असून सभा मंडप, समाज मंदिर, व्यायामशाळा, संरक्षक भिंत, बँड स्टँड, बँड प्रशिक्षण केंद्र, जॉगिंग ट्रॅक, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरिता खेळणी, बहउद्देशीय इमारत, ओपन जिम, शाळा, संगणक प्रशिक्षण केंद्र तसेच संपूर्ण गावाचेसुशोभीकरण करण्यात येणार आहे. दिवाळे गाव हे स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळणार आहे. स्वच्छता व सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे, असे सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक गाव हे स्मार्ट व्हिलेज तयार करावे असे स्वप्न साकारले आहे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून सन 2004 सालापासून दिवाळे गाव हे मी दत्तक घेतले असून या गावांमध्ये मी अनेक जेट्टी उभारल्या आहेत. या गावाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आता दिवाळे गाव हा माझा पायलट प्रोजेक्ट असून त्याच धर्तीवर बेलापूर मतदारसंघातील इतर गावेही स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास येणार असल्याचे आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.