केंद्र शासनातर्फे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय हेल्पलाईन सुरु

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

पनवेल ः मागील काही दशकांमध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. मिळालेल्या आकडेवारीवरुन सदरची वाढ एक मोठी आवाहन ठरणार आहे. अशा प्रकारे शहरी आणि ग्रामीण भागातील जेष्ठांना विशेष सेवा पुरविण्यासाठी नवीन मॉडेल्सची आवश्यकता आहे, याचसाठी केंद्रिय सामाजिक न्याय-सबलीकरण मंत्रालय यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय हेल्पलाईन (िंथ्िंRथ्घ्ऱ्िं-१४५६७) सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी नॅशनल इम्प्लीमेंटीग ऐजन्सी (ऱ्घ्ीं), राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था (ऱ्घ्ए), सामाजिक न्याय-सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय-विशेष साह्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिक राष्ट्रीय हेल्पलाईन-१४५६७ (ऱ्ींऊघ्ध्ऱ्ींथ् प्िंथ्झ्थ्घ्ऱ्िं इध्R एिंऱ्घ्ध्R ण्घ्ऊघ्ैंिंऱ्ए-१४५६७) सुरु आहे.

राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन महाराष्ट्र राज्यासाठी स्मितेश शहा प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. रेखा आनंद (टीम लीडर), हणमंत धुमाळ (टीम लीडर) म्हणून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी समन्वय साधतात. तर सत्यपाल लोणे (फील्ड रिस्पॉन्स ऑफिसर) म्हणून पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी कार्यरत आहेत.

राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाईन तयार करुन ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे. तसेच अत्याचार ग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी आणि इतर सेवांसाठी वेळोवेळी आपल्या सहकार्याची गरज भासणार आहे.
 

राष्ट्रीय हेल्पलाईन संबंधी माहितीः
राष्ट्रीय हेल्पलाईन वयोवृध्द व्यक्तींसाठी असून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन द्वारे चालवली जात आहे. हेल्पलाईन टोल फ्री नंबर-१४५६७ आहे. हेल्पलाईनची वेळ सकाळी ८ वा. ते रात्रौ ८ वाजेपर्यंत असेल. वर्षातील ३६५ पैकी ३६१ दिवस (२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर आणि १ मे महाराष्ट्र दिन असे सुट्टीचे दिवस वगळून) हेल्पलाईन सुरु राहणार आहे.

सदर हेल्पलाईनवर मिळणाऱ्या सेवाः माहिती आरोग्य जागरुकता, निदान, उपचार निवारा-वृध्दाश्रम घरे, डे-केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक, आदि. मार्गदर्शनः कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी), आर्थिक, पेन्शन संबंधित सरकारी योजना, आदि. भावनिक आधार देणे चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्युशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्युपूर्वीचे दस्तऐवजीकरण), क्षेत्रीय पातळीवर मदत-बेघर, अत्याचारग्रस्त वृध्द, ज्येष्ठ हरवलेले व्यक्तींची सेवा आणि काळजी घ्ोण्यासाठीी. सदर हेल्पलाईनसाठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या हेल्पलाईनवर १४५६७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधणे. जेणेकरुन वृध्द व्यक्तीची योग्य ती मदत करुन त्यांची काळजी घ्ोता येईल, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सर्वच विभागांमध्ये लोकसहभागातून महापालिकेचा वैशिष्ट्यपूर्ण कचरा वर्गीकरण जनजागृती उपक्रम