शिरवणे येथील स्वयंभू गणेश मंदिर येथे दीपस्तंभाची उभारणी

शिरवणे मधील पौराणिक प्राचीन स्वयंभू गणेश मंदिर येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दीपस्तंभाची उभारणी

नवी मुंबई ः ठाणे-बेलापूर पट्टीतील शिरवणे मधील पौराणिक प्राचीन स्वयंभू गणेश मंदिर येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दीपस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे पुरातन स्वयंभू गणेश मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली असून दीपस्तंभाच्या उभारणीने भक्तगण सुखावले आहेत. नवी मुंबई महापालिकेने सुमारे साडेबारा लाख रुपये खर्च करुन स्वयंभू गणेश मंदिरालगत पौराणिक पध्दतीने दिपस्तंभाची उभारणी केली आहे. गणेश भक्तांच्या मागणीनुसार ‘श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट'चे सचिव तथा माजी महापौर  जयवंत सुतार यांनी दीपस्तंभ उभारणीसाठी महापालिकाकडे मागणी केली होती. त्यांच्या सदर मागणीची त्वरित दखल घेत नवी मुंबईच्या सौंदर्यात अधिकच भर घालणाऱ्या स्तंभाची उभारणी त्वरित करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले होते. त्यानुसार शहर अभियंता संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता गिरीश गुमास्ते, उपअभियंता पंढरीनाथ चवडे, कनिष्ठ अभियंता वैशाली गुरव यांनी दीपस्तंभाचे बांधकाम अतिशय सुबक आणि रेखीव पध्दतीने केले.  या दीपस्तंभाचा लोकार्पण सोहळा माजी महापौर जयवंत सुतार, समाजसेविका सौ. निर्मला सुतार यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी ‘ट्रस्ट'चे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे नंदकुमारबुवा सुतार, वेदमुर्ती  प्रविण जोशी (गुरुजी), अरुणा भोईर, रेश्मा भोईर, समाजसेवक जयेंद्र सुतार, हनुमंत रोडे, नरेश सुतार, जयेश धुमाळ, अजित सुतार, हेमंत पाटील तसेच अन्य  भाविक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरी विकासातील विशेष कामगिरीबद्दल नवी मुंबई महापालिकेला ‘कन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड-२०२३' या पुरस्काराने सन्मानित