रेल्वे स्थानकांवर गर्दूल्ल्यांचा उपद्रव वाढला

रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

नवी मुंबई -: नवी मुंबईत  अंमली पदार्थ सेवन  करणाऱ्या गर्दूल्ल्यांचा रेल्वे स्थानक परिसरात उपद्रव वाढत चालला असून त्याचा  नाहक त्रास प्रवाशांना होत असून महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आधुनिक शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. मात्र याच आधुनिक शहराला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे. त्यामुळे शहरातील मोकळ्या जागा, उद्याने, पडीक जागेत असे अंमली पदार्थ सेवन करणारे गर्दुल्ले राजरोस दिसत असतात. मात्र अशा गर्दूल्ल्यांचा आता नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांना देखील वेढा पडला आहे. नवी मुंबईत हार्बर आणि ट्रान्स हार्बर अशा दोन्ही  मार्गावर अत्याधुनिक अशी रेल्वे स्थानके सिडकोने विकसित केली आहेत. मात्र येथील गर्दूल्ल्यांचा वावर पाहता महिला वर्गात प्रवास करताना भीतीचे वातावरण असते. त्यामुळे अशा रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कारवाई करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.

नवी मुंबई शहर हे  तुलनेने महीलांसाठी सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. मात्र रेल्वे स्थानकात  गर्दूल्ल्यांचा उपद्रव पाहता एकट्या महिलेने प्रवास करताना भीती वाटत असते. त्यामुळे रेल्वे पोलीस, सुरक्षा रक्षकांनी अशा गर्दूदुल्ल्यांवर कारवाई केली पाहिजे. - मोनिका गोटेकर, रेल्वे प्रवासी, शिवडी.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बाबा महाराज सातारकर यांना पत्नी शोक