महापालिकेच्या पत्राला एम आय डी सी कडून केराची टोपली?

महापेत नैसर्गिक नाल्यावर खाजगी कंपनीने केले बांधकाम

नवी मुंबई -:  महापे एम आय डी सी भागात नैसर्गिक नाल्यावर बांधकाम केल्या प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने कार्यवाही करावी म्हणून एम आय डी ला पत्र दिले आहे. मात्र सदर पत्र देऊन देखील कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याने दुबार पत्र देण्यात आले आहे.

महापे एम आय डी सी भागात हनुमान नगर मधून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर खाजगी  कंपनी धारकांकडुन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. याबाबत मनपा कोपर खैरणे विभागात तक्रारी प्राप्त झाल्या नंतर मनपा अधीकाऱ्यांनी पाहणी केली  आणि त्यात नाल्यावर बांधकाम केल्याचे दिसून आले. सदर नाला हा महापे हनुमान नगर मधून जाऊन मिलेनियम बिजनेस पार्क, रिलायन्स  कंपनी होऊन पुढे ठाणे बेलापुर मार्गावर निघतो. त्यामुळे पावसाळ्यात  जर या पुर सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास या भागात वित्त तसेच जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे सदर प्रकरणी उचीत कार्यवाही करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने एम आय डी सी प्रशासनाला दोन वेळा पत्र दिले आहे. मात्र या पत्राला एम आय डी ने केराची टोपली दाखवली आहे.

महापे एम आय डी सी भागात हनुमान नगर मधून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर बांधकाम झाल्याबाबत पाहणी करून कार्यवाही करण्याबाबत नवी मुंबई महानगर पालिकेचे पत्र आले आहे. त्यानुसार स्थळ पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांना सादर केला जाईल. - संतोष कळसकर, उप अभियंता, महापे, एम आय डी सी भाग १

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रेल्वे स्थानकांवर गर्दूल्ल्यांचा उपद्रव वाढला