संपामुळे एपीएमसी मार्केट मधील व्यवहार पूर्णपणे ठप्प

माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप

नवी मुंबई ः माथाडी कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. संप, आंदोलने, बैठका झाल्या; परंतु माथाडी कामगरांचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. परिणामी,  सरकारच्या निषेधार्थ १ फेब्रुवारी रोजी माथाडी कामगारांनी, माथाडी कामगार नेते तथा ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ'चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक संप पुकारला. या संपामुळे नवी मुंबई मधील पाचही मार्केट बंद होते. पहाटेच्या सुमारास सुरु होणाऱ्या भाजीपाला, फळ मार्केट मध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या शासनाकडील विविध विभागांकडे असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची मागणी व्ोÀली आहे. अन्यथा त्यांनी यापुढे माथाडी कामगार अधिक तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे.

माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करावी. सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करावी. विविध माथाडी मंडळाच्या
पुनर्रचना करुन त्यावर ‘युनियन'च्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे. विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे. माथाडी कायदा आणि विविध माथाडी मंडळांच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करणे. विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगार आणि अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करणे. माथाडी कामगारांच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करणे. बाजार समितीच्या मापाडी-तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घ्ोणे. ‘सिडको'मार्फत माथाडी कामगारांना नवी मुंबई परिसरात तयार घरे मिळणे. नवीन सरकार स्थापन होऊन अनेक महिने झाले तरी अद्याप माथाडी कामगारांच्या प्रश्नावर एकही बैठक झाली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'च्या माध्यमातून एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन पुकारले. सदर लाक्षणिक संपाला बॉम्बे गुडस्‌ ट्रान्सपोर्ट असोसिएशन, बाजार समिती आवारातील व्यापारी असोसिएशन, किरकोळ व्यापारी असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांनी पाठिंबा दर्शविला. तर संपात बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील विविध उद्योगातील व्यवसायातील माथाडी कामगारांबरोबर नाशिक, अहमदनगर, पुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, लातूर आदि विभागातील माथाडी कामगार सहभागी झाले होते.

या संपावेळी एपीएमसी मधील माथाडी भवनसमोर जाहिर सभा घ्ोण्यात आली. यावेळी नरेंद्र पाटील यांच्यासह ‘युनियन'चे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, बापूसाहेब भुजबळ, चंद्रकांत ढोले, मोहनभाई गुरनानी, शरद माऊ, अमृतलाल जैन कैलासमेत ताजणे, राजीव मनीवार आदिंनी मार्गदर्शन केले. अण्णासाहेबांचे माथाडी कामगार आणि त्यांची कामगार संघटना माझा जीव की प्राण आहे. जोपर्यंत माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. सरकार कोणाचेही असो जोपर्यंत माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील. सरकारला आम्ही विरोध करतच राहू प्रसंगी त्यांच्या गाड्याही अडवू. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारचे अधिवेशन सुरु होत आहे. त्या आधी जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संबंधित मंत्री तसेच अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठका घेऊन माथाडी कामगारांना रास्त न्याय दिला नाहीतर भव्य लढा उभारु. अधिवेशनात माथाडी कामगार विधान भवनमध्ये धडकतील, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

व्यवसाय सुलभता ‘सिडको'चे पोर्टलद्वारे अर्ज सादर करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध