निवारा शेड उभारणीच्या कामात आर्थिक घोटाळा ? चौकशी करण्याची मागणी

 निवारा शेड उभारणी कामात आर्थिक घोटाळा ?

नवी मुंबई ः महापालिका प्रशासनाने वाशी मध्ये नाका कामगारांसाठी उभारलेल्या निवारा शेडवर स्टिकरींग केलेले नसल्याने निवारा शेड उघडे बोडके दिसत आहे. महत्वाचे म्हणजे निवारा शेड उभारणीच्या कामात आर्थिक घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी कामगार नेते प्रदीप वाघमारे यांनी केली आहे. नाका कामगारांसाठी नाक्यावर कामगार शेड उभारुन नाका कामगारांना सुविधा द्यावी म्हणून कामगार नेते प्रदीप वाघमारे यांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार वाशी नाक्यावर कामगार निवार शेड उभे केले आहे. परंतु, कित्येक महिन्यांपासून वाशी नाक्यावर नाका कामगारांसाठी निवारा शेड उभे करण्यात आले असून अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर त्या ठिकाणी बसण्यासाठी बाकडे लावण्यात आले आहेत. परंतु, आजतागायत सदर निवारा शेडवर नवी मुंबई महापालिकेने स्टिकरींग केले नसल्याने निवारा शेड बोडके दिसत आहे.

अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे असे घडत असल्याचे प्रदीप वाघमारे यांचे म्हणणे आहे. नाका कामगार निवारा शेडवर स्टिकरींग करावे म्हणून वाशी विभाग कार्यालयातील अभियंता चौधरी यांना वारंवार विनंती केली. पण, आजतागायत त्यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात न घेता स्टिकरींगच्या कामाकडे र्दिलक्ष केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. याशिवाय उभ्या केलेल्या कामगार शेडचे कामही योग्य पध्दतीने झाले नसून वापरलेले मटेरियल हलक्या पध्दतीचे वापरल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे सदर शेडच्या कामात आर्थिक घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी शहर अभियंता संजय देसाई यांच्याकडे मागणी करणार असल्याचे प्रदीप वाघमारे यांनी सांगितले.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नवी मुंबई फेस्टीव्हल'ची उत्साहात सांगता