प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापरास खीळ बसावी यादृष्टीने महापालिकेकडून धडक कारवाया

प्लास्टिक पिशव्यांचा वापर; २० व्यावसायिकांवर कारवाई

नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण मधील एक महत्वाचा भाग म्हणजे निसर्गाला हानीकारक असणाऱ्या एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे असून यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महापालिका क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत आहे.

पर्यावरप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिकचा धोका ओळखून प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळावा. तसेच पर्यायी कापडी आणि कागदी पिशव्यांचा प्राधान्याने वापर करावा याविषयी महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापरास खीळ बसावी यादृष्टीने धडक कारवाया करण्यात येत आहेत.

अशाच प्रकारची प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाई ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी  महेंद्र सप्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सलग २ दिवस केली असून पहिल्या दिवशी ४० हजार आणि दुसऱ्या दिवशी ६० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे.

यामध्ये ऐरोली, सेक्टर-२ येथील हॉटेल वृषाली, फिरोज चायनीज सेंटर, साई स्नॅक्स, लोकल कट्टा, महालक्ष्मी भोजनालय, पतंग हॉटेल, बेहप्पा मोमोज, सावित्रीदेवी निषाद या व्यावसायिकांकडून सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ऐरोली, सेक्टर-२०, ऐऱोली गांव, यादवनगर तसेच प्र.क्र. ११, १२, १४, ६ या परिसरात धडक कारवाई करत ४५ दुकानांची झडती घ्ोण्यात आली. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळलेल्या स्टोअर्स, किराणा भांडार, चिकन शॉप, डेअरी, जनरल स्टोअर्स, फळ विक्रेता अशा १२ व्यावसायिकांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे २ दिवसात ऐरोली विभाग कार्यक्षेत्रात १ लाख रक्कमेचा दड सहाय्यक आयुक्त महेंद्र सप्रे यांच्या नियंत्रणाखाली, स्वच्छता अधिकरी सुभाष म्हसे, कनिष्ठ अभियंता मयुरेश पवार, अधीक्षक महेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जमा केला आहे.

दरम्यान, प्लास्टिक पर्यावरणासह मानवी जीवनाला सर्वाधिक धोका पोहोचविणारी गोष्ट असून सुजाण व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्या देऊच नयेत. तसेच पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा, असे आवाहन महापालिकच्या वतीने करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निवारा शेड उभारणीच्या कामात आर्थिक घोटाळा ? चौकशी करण्याची मागणी