कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये सर्वात प्रगत ऑर्थो रोबोट

नवी मुंबई ः कोपरखैरणे मधील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल येथे पहिली रोबोटिक-आर्म असिस्टेड सर्जिकल सिस्टीम स्ट्रायकर माकोचे क्लिनिकल लॉन्च करण्यात आले आहे. सांधे प्रत्यारोपण सर्जरीसाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या सर्वात प्रगत ऑर्थो-रोबोटिक तंत्रज्ञानांपैकी ते एक तंत्रज्ञान आहे. याद्वारे कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक्स डॉ. सुभाष धिवरे यांनी या नवीन रोबोटिक सिस्टीमचा उपयोग करुन दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.

युएस एफडीएने मान्यता दिलेल्या माको रोबोटिक सिस्टिममुळे खुबा, गुडघा यांचे संपूर्ण प्रत्यारोपण तसेच गुडघ्याचे आंशिक प्रत्यारोपण करण्याच्या पध्दतीमध्ये मोठी क्रांती घडवून आणली आहे. सांधे प्रत्यारोपणासाठी सर्वात प्रगत तंत्रज्ञान, माको रोबोटिक सिस्टिम्स असलेले कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईतील पहिले रुग्णालय आहे. जगभरात ५००,००० पेक्षा जास्त प्रक्रियांमध्ये यशस्वी सिध्द झालेल्या माको स्मार्टरोबोटिक्सची शक्ती आता नवी मुंबईमध्ये उपलब्ध आहे. या प्रगत तंत्रज्ञानामध्ये थ्रीडी सीटी-बेस्ड प्लॅनिंग, ॲक्युस्टॉप हॅपटिक तंत्रज्ञान आणि माहितीपूर्ण डेटा ऍनालिटिक्स यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणून रुग्णांना अनेक वेगवेगळे लाभ प्रदान केले जातात. रुग्णांच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित सुविधा, उपाययोजना आणण्यात कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल कायम आघाडीवर असते. रोबोटिक सर्जिकल प्लॅटफॉर्म्सनी शस्त्रक्रियेच्या विश्वात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. पारंपरिक सर्जरीच्या तुलनेत रुग्ण जास्त लवकर बरे होतात, गुंतागुंत कमी होते आणि शरीरावर शस्त्रक्रियेचे घाव, जखमा देखील कमी होतात. नवी मुंबईतील रुग्णांच्या फायद्यासाठी स्ट्रायकर माको प्रगत ऑर्थो-रोबोटिक तंत्रज्ञान सर्वात पहिल्यांदा आमच्याकडे आणले गेले आहे, असे हॉस्पिटलचे नवी मुंबई संचालक तथा प्रमुख डॉ. बिपीन चेवले यांनी सांगितले.

आज ऑर्थोपेडिक्स सर्जरी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास होत असल्याने मानवी हातांनी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत सांधे प्रत्यारोपण अधिक अचूक आणि निर्दोषपणे केले जाऊ शकते. माकोचे सीटी-बेस्ड प्लॅनिंग दुखापत झालेल्या सांध्याचे थ्रीडी मॉडेल तयार करते. त्यामुळे सर्जनला रुग्णाचा सांधा आणि तेथील दुखापत यांचे संपूर्ण दृश्य पहायला मिळते. अशाप्रकारे सर्जनला प्रत्येक रुग्णासाठी एक व्यवतीगत योजना तयार करता येते, असे डॉ. सुभाष धिवरे म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

९१.०२ टक्के मतदान; ३५ हजार ७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क