स्वच्छता मोहीमेत कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज मधील एनएसएस स्वंयसेवकाचा विशेष सहभाग

‘युगनिर्माते प्रतिष्ठान'तर्फे बेलापूर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
 

नवी मुंबई ः ‘युगनिर्माते प्रतिष्ठान'च्या वतीने नवी मुंबईतील एकमेव असलेल्या किल्ले बेलापूर या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत ८० ते १०० एनएसएस स्वंयसेवक, नवी मुंबई महापालिका अधिकारी, स्वच्छता दूत, मित्र परिवार उपस्थित होते. सदर स्वच्छता मोहिमेत खारघर येथील सरस्वती इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज मधील एनएसएस स्वंयसेवकाचा विशेष सहभाग होता.

यावेळी स्वछता अधिकाऱ्यांनी उपस्थितांना ‘माझा कचरा, माझी जबाबदारी' याबाबत माहिती देतानाच स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच ‘युगनिर्माते प्रतिष्ठान'चे अध्यक्ष शंकर वसमाने यांनी उपस्थितांना माझे गडकिल्ले, माझी जबाबदारी याची माहिती देऊन उपस्थित युवा वर्गात चेतना निर्माण केली.

दरम्यान, किल्ले बेलापूर यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करेपर्यंत युगनिर्माते प्रतिष्ठान किल्ल्याच्या संवर्धनाकरिता काम करत राहील, असे देखील वसमाने यांनी ग्वाही दिली. यावेळी नवी मुंबई महापालिका स्वच्छता अधिकारी विजय नाईक आणि मिलिंद तांडेल, सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्राध्यापिका सुनिता पाल त्याचप्रमाणे ‘युगनिर्माते प्रतिष्ठान'चे पदाधिकारी अक्षय चव्हाण, सौरभ आहेर, सुदर्शन कौदरे, आकाश वसमाने, आदि उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ'च्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची तर कार्यवाह पदी प्रविण पुरो यांची निवड