विमानतळावरील स्फोटांच्या तीव्रतेने इमारतींना तडे
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) बांधकामात मोठे डोंगर भुईसपाट करण्यासाठी केलेल्या स्फोटांच्या तीव्रतेविरोधात जवळपास ३५० लोकांनी ९०० मीटर लांब मौन मानवी साखळी तयार करुन आपला निषेध नोंदविला. यावेळी आंदोलनकर्त्या रहिवाशांनी सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१५ मधील जॉगर्स ट्रॅकपासून हातात बॅनर धरुन ‘मानवी साखळी' केली होती. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प ठिकाणी वारंवार होणाऱ्या स्फोटांच्या तीव्रतेमुळे सीबीडी-बेलापूर मधील इमारतींच्या भिंतींना पडणाऱ्या भेगा आणि खिळखिळ्या झालेल्या खिडक्यांच्या काचांमुळे त्रस्त असलेल्या रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांना ‘मानवी साखळी'द्वारे वाचा फोडली.
‘नॅटकनेक्ट फाउंडेशन'ने सुरु केलेल्या सदर शांततामय विरोधाला केवळ भेगा पडलेल्या हाऊसिंग सोसायट्यांकडूनच नव्हे तर सीवुडस् एनआरआय आणि पारसिक हिल परिसरातील नागरिकांनी देखील आंदोलनात सहभाग दर्शविला. यासंदर्भात आम्ही केलेल्या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात राज्य विमान वाहतूक आणि नगरविकास विभागांना हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले होते. स्फोटांचा परिणाम झालेल्या इमारतींचे संरचनात्मक ऑडीट करण्याचे शासनाने आदेश द्यावेत, अशी आमची मागणी आहे, असे ‘नॅटकनेक्ट फाउंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीने (एनएमआयए) स्फोटांची तीव्रता कमी करणे आणि शासन किंवा एनएमआयएने इमारतींचे संरचनात्मक ऑडीट करण्याच्या तात्काळ आवश्यकता अधोरेखीत करणारे संदेशात्मक बॅनर्स ‘मानवी साखळी'मध्ये सहभागी नागरिकांनी हातात धरले होते.
आमचा विमानतळ प्रकल्पाला बिल्वुÀल विरोध नाही. पण, कठीण खडकाळ डोंगरांमध्ये घडविण्यात येत असलेल्या स्फोटांचा आम्हाला अतिशय त्रास होत आहे, असे सीबीडी सेक्टर-११ मधील अरेंजा को-ऑप हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी रोहित अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केले. स्फोटांमुळे आमच्या रहिवासी भागात धुळीचे प्रदुषण होत असल्याचे देखील अग्रवाल यांनी सांगितले.
सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१५मध्ये कार्यरत असणाऱ्या जनरल फिजीशिअन डॉ. बी. बी. गजरे यांच्या म्हणण्यानुसार श्वसन समस्या असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मी राहत असलेल्या साई विहार बिल्डीगला देखील भेगा पडल्या असल्याचे त्या म्हणाल्या. रियल्टर इस्त्राइल शेख यांनी विमानतळ प्रकल्पावरील स्फोटांच्या तीव्रतेमुळे त्यांच्या खिळखिळ्या झालेल्या खिडक्यांच्या तावदानांचे फोटो शेअर केले आहेत. तर साई विहार सोसायटी मधील सुर्यकांत पांडे यांनी इमारतीच्या खांबांना आणि भिंतींना पडलेल्या
भेगा दाखवत विमानतळ प्रकल्प ठिकाणी होणाऱ्या स्फोटाचा परिणाम असल्याचे सांगितले. सुर्यकांत पांडे यांच्या सदर तक्रारीला प्रतिसाद देत नवी मुंबई विमानतळ प्रकल्पावरील ‘सिडको'चे मुख्य अभियंता आर. बी. धायटकर यांनी साई विहार सोसायटी विमानतळ प्रकल्पाच्या उत्तरेकडील सीमेलगत असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी ‘एनएमआयएएल'ला सदर प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
याबाबत सिडको नियोजक म्हणून स्वतःची जबाबदारी टाळू शकत नाही. अदानी एयरपोर्टस् लि. मार्फत होत असलेले विमानतळ प्रकल्पाचे काम ‘सिडको'चे स्वतःचे आहे. पर्यावरण संबंधित सर्व अटींचे पालन केले जाण्याची सुनिश्चिती करणे ‘सिडको'च्या अधिकाऱ्यांचे कर्तव्यच आहे . -बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.
माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी मुख्यमंत्री आणि सिडको रहिवाशांच्या सदर वास्तववादी तक्रारींवर योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे. -सौ.नेत्रा शिर्वेÀ, माजी नगरसेविका-नवी मुंबई महापालिका.
डोंगर भुईसपाट करण्यासाठी केल्या जाणाऱ्या स्फोटांमुळे अनियंत्रित स्वरुपात धुळीचे प्रदुषण होत आहे. त्याचा एक्यूआय (एयर क्वालिटी इंडेक्स)वर देखील परिणाम होत आहे. -विष्णू जोशी, पारसिक ग्रीन्स.