टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तु तसेच विज्ञान, गणित, भूगोल या विषयांचे वर्कींग मॉडेल

खारघर मधील ए.बी.घरत शाळेमध्ये अमृतकला सायन्स, आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शन 

नवी मुंबई : खारघर येथील ए.बी. घरत इंग्रजी मिडीअम शाळेमध्ये २७ जानेवारी रोजी अमृतकला सायन्स, आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत, टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तु तसेच विज्ञान, गणित, भूगोल या विषयांचे वर्कींग मॉडेल तयार केले.

 या अमृतकला सायन्स, आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शानचे उद्घाटन रायगड विभागाच्या शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार, रायगड विभागाचे माजी सीईओ देवरुषी सर, उपशिक्षणाधिकारी पालकर मॅडम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शाळेचे विश्वस्त के. बी. घरत, डी.बी.घरत, मुख्याध्यापिका मिनल फामे, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. २८ जानेवारी रोजी हे प्रदर्शन पालकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाला रायगड जिल्हा परिषद शाळा बेलपाडा येथील विद्यार्थी, शिक्षक तसेच मुख्याध्यापक आदींनी भेट दिली. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिस देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव-२०२३'चा समारंभ उत्साहात मराठी नृत्यगीताच्या कार्यक्रमाने ‘महोत्सव'ची सांगता