शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन देण्यासाठी येत्या १५  फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेला १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक  शिष्यवृत्ती योजना घोषित करण्यात आली आहे. शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन देण्यासाठी येत्या १५  फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घ्ोण्यात आला आहे, अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.

विधवा-घटस्फोटीत महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण, आर्थिक आणि दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करणे, नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार आणि कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप आणि नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण-बांधकाम-रेती-नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे या घटकांतर्गत शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून देण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. त्याकरिता ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात अर्ज भरुन देण्यात विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे विलंब होत असल्याचे अनेक लोकप्रतिनिधी तसेच पालकांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. बँकेत खाते उघडण्यासाठी वेळेते बोनोफाईड प्रमाणपत्र न मिळणे, बँकेत खाते उघडण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागणे, उत्पन्नाचा दाखला वेळेत उपलब्ध न होणे, ऑनलाईन फॉर्म भरताना विविध अडचणी येणे आदि विविध प्रकारच्या अडचणींमुळे अर्ज भरण्यामध्ये विलंब होत असल्याचे पालकांनी निदर्शनास आणून दिले होते. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने शैक्षणिक शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपायुवत दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तु तसेच विज्ञान, गणित, भूगोल या विषयांचे वर्कींग मॉडेल