सुरक्षा रक्षकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

दिव्याज फाऊंडेशन तर्फे सुरक्षा रक्षकांची आरोग्य तपासणी

नवी मुंबई ः अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाऊंडेशन तर्फे सानपाडा रेल्वे स्थानकातील ‘महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ'च्या मुख्यालयात सुरक्षा रक्षकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराप्रसंगी अमृता फडणवीस, प्रसिध्द सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासह आरोग्य तपासणी शिबिराचे समन्वयक संदीप घुगे, कामगार आयुक्त सुरेश जाधव, मुंबई-ठाणे सुरक्षा रक्षक मंडळाचे संचालक विलास बुवाजी, आदि उपस्थित होते. सदर शिबिरासाठी ठाणे येथील सिध्दीविनायक हॉस्पिटल आणि डाबर इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

आज महाराष्ट्रातील जनतेला आपल्या सेवेतून सुरक्षा पुरवणाऱ्या कार्यतत्पर सुरक्षा रक्षकांचे आभार व्यक्त करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल ‘महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ'चे ऋणी आहे. आपले सुरक्षा रक्षक बांधव आणि भगिनी दिवस-रात्र आपले रक्षण करुन बहीण आणि भावाची जवाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी त्यांच्या प्रती शक्य असेल तेवढी मदत करेन, अशी ग्वाही यावेळी अमृता फडणवीस यांनी दिली.

आज आपण रस्त्यावरुन सुरक्षित चालू फिरु शकतो, ते फक्त आपल्या पोलीस आणि सुरक्षा रक्षक बंधू-भगिनींमुळे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी देखील आपल्या आरोग्याकडे तितकेच काळजीने बघितले पाहिजे. मी लवकरच सुरक्षा रक्षकांसाठी मिक्स मार्शल आर्टस्‌चे सेमिनार आयोजित करणार आहे, असे सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी सांगितले.

दरम्यान, कोव्हीड काळात राज्यात डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून ‘महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ'च्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपली जवाबदारी पार पाडली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी आपल्या सुरक्षा रक्षकांनी समय सुचकता दाखवून कामगिरी पार पडली होती. आज दिव्याज फाऊंडेशच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी सुरक्षा रक्षकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले, त्याबद्दल त्यांचे संदीप घुगे यांनी आभार व्यक्त केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीवुडस्‌ येथील ग्रँड सेन्ट्रल मॉलमध्ये फ्लॅश मॉब सारखा वेगळा उपक्रम