अपोलो हॉस्पिटल्स येथेही नवीन ध्वज चौकीच्या उद्‌घाटनासोबत प्रजासत्ताक अनाेख्या पद्धतीने साजरा

यकृत दाता पोलीस पित्याच्या हस्ते ध्वजारोहण

नवी मुंबई ः २६ जानेवारी रोजी संविधान सन्मानार्थ शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि खाजगी संस्थांसह देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सीबीडी-बेलापूर मधील अपोलो हॉस्पिटल्स येथेही नवीन ध्वज चौकीच्या उद्‌घाटनासोबत प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्याचे नुकतेच अपोलो हॉस्पिटल्स येथे यकृत प्रत्यारोपण झाले त्या रुद्र गोसावी आणि त्याला यकृत दान करणारे त्याचे वडील नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गोसावी उपस्थित होते. यावेळी सचिन गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुरक्षा रक्षकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन