ठाणे येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजवंदन

ठाणे ः भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त साकेत मैदान येथील पोलीस क्रीडा संकुलात ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यप्रसंगी आमदार संजय केळकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुषमा सातपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी माजी सैनिक आणि कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन जगन्नाथ माने यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान रामदास भाऊ भोगाडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विविध शासकीय विभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आपदा मित्र प्रशिक्षण घ्ोतलेल्यांना यावेळी आपदा मित्र प्रमाणपत्रांचे वितरणही जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी झालेल्या संचलनात १६ पथके सहभागी झाली होती. ‘ठाणे ग्रामीण पोलीस'च्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. दुय्यम परेड कमांडर पोलीस निरीक्षक तिलकचंद कांबळे होते. राज्य राखीव पोलीस बल गट क्र.११, ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पोलीस मुख्यालय पथक, ठाणे ग्रामीण पोलीस, शहर परिमंडळ पोलीस, महिला पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक, शहर वाहतूक पोलीस, गृहरक्षक दल, प्रादेशिक कार्यालय, ठाणे महापालिकेचे महिला आणि पुरुष सुरक्षा रक्षक, स्काऊट गाईड, पोलीस बँड पथक, अग्निशमन दल, एनसीसी कॅडेट आदि पथके या संचालनात सहभागी झाली होती. तसेच वाहतूक शाखेचे चित्ररथ, दंगल नियंत्रण वाहन, वरुण वाहन, अग्निशमन वाहन, सामाजिक वनीकरण विभागाचे योजना वाहन, ठाणे परिवहन सेवेतील इलेक्ट्रिक बस, जिल्हा रुग्णालयाचे रुग्णवाहिका आदहिी संचलनात सहभागी झाले होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वैदभियांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न