कोकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन संपन्न

 नवी मुंबई ः भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ कळंबोली मधील नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे कोकण विभागीय आयुक्त  डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आदिंना विभागीय आयुक्त कल्याणकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, विभागीय अतिरिवत  अतिरिवत आयुवत किशन जावळे, विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) प्रविण पवार, पोलीस सह-आयुक्त संजय मोहिते, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.११, जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रक पथक, नवी मुंबई पुरुष पोलीस पथक क्र.१,  बँड पथक, डॉग स्कॉड, मार्कस मॅन वाहन, आर.आय.व्ही.वाहन, बीडीडीएस वाहन, वरुण वाहन, मिनी वॉटर टेंडर, रेस्क्यु व्हॅन, नवी मुंबई महापालिका अग्निशमन वाहन आदिंनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
सदर समारंभात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहायक आयुक्त पोलीस शैलेश पासलवाड यांना उल्लेखनीय सेवेबद्दल, वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे यांना हायप्रोफाईल गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास लावण्याबद्दल तसेच पनवेल शहर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी महापालिका शाळा क्र.११२, करावे, महापालिका शाळा क्र.१५ शिरवणे, महापालिका शाळा क्र.१८ सानपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

सदर कार्यक्रमास उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख, उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, उपायुक्त (पुनर्वसन) रिता मेत्रेवार, उपायुक्त (पुरवठा) लिलाधर दुफारे, उपायुक्त (करमणूक) मंदार वैद्य, उपायुक्त (नियोजन) संजय पाटील, उपायुक्त (रोहयो) अजित साखरे, विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, सेवाकर उपायुक्त कमलेश नागरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजवंदन