भांडूप परिमंडलात ५०,१९,९४२  युनिटची ९ कोटी ८८ लाखाची वीजचोरी उघडकीस

गेल्या १० महिन्यात ५६७० वीजचोरींची प्रकरणे उघडकीस

नवी मुंबई ः ‘महावितरण'ची थकबाकी वाढत असून, वीजबिल वसुलीवर विशेष लक्ष देणे सर्व परिमंडलांना भागच आहे. पण, वीजेचा अनधिकृत वापर रोखणेही तितकेच महत्वाचे आहे. भांडूप परिमंडलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी अथक प्रयत्न करुन वीजबिल वसुलीवर भर देत आहेत. याशिवाय, वीज जोडणी तपासणी, ०-३० रीडिंग नोंदवत असलेल्या मीटरची तपासणी असे विविध उपक्रम सतत सुरु असतात. या तपासणी मध्ये भांडूप परिमंडलात १ एप्रिल २०२२ ते १५ जानेवारी २०२३ या दरम्यान विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ आणि कलम १३५ तसेच आकडा टाकून अशी एकूण १८ कोटी ४८ लाख रुपयांची वीज चोरीची ५६७० प्रकरणे उघडकीस आली आहेत.

१ एप्रिल २०२२ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार भांडूप परिमंडलात ५०,१९,९४२  युनिटची ९ कोटी ८८ लाखाची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये ठाणे परिमंडल कार्यालय अंतर्गत ६५४  प्रकरणात ३ कोटी २४ लाख, वाशी परिमंडल कार्यालय अंतर्गत १,०७५  प्रकरणात ४  कोटी ५७ लाख आणि पेण परिमंडल कार्यालय अंतर्गत  ६८६ प्रकरणात २ कोटी ६ लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. याशिवाय, विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार ठाणे परिमंडल कार्यालय अंतर्गत १७०१ प्रकरणात ४  कोटी ११ लाख, वाशी परिमंडल कार्यालय अंतर्गत ६४६ प्रकरणात २ कोटी ३२ लाख तर पेण मंडल कार्यालयात २६१ प्रकरणात ७३.४८ लाख असा एकूण २६०८ प्रकरणात ७ कोटी १८ लाखाचा अनधिकृत वीजेचा वापर आढळून आला आहे. या शिवाय आकडा टाकून वीजचोरी करण्याची ६४७ प्रकरणे समोर आली आहेत. या मध्ये १ कोटी ४२ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. सदर मोहिमेत ‘महावितरण'चे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिवत कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि लाईनस्टाफ पर्यंत प्रत्येकांनी विशेष मेहनत घ्ोतली आहे.

वीजचोरी रोखणे ‘महावितरण'पुढे एक मोठे आव्हान आहे. ‘महावितरण'ने वीज चोरांवर तीव्र कारवाई सुरु केली असून, ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे प्रामाणिकपणे भरण्याची आवश्यकता आहे. वीजचोरी सारख्या अनधिकृत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांविरुध्द विद्युत कायदा २००३ प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येत असून, या कारवाईत वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना दंड आणि कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी वीजचोरी सारख्या कृत्यापासून दूर राहावे, असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन संपन्न