कोंकण शिक्षक मतदारसंघाचे प्रचारार्थ शाळांच्या शिक्षकांसह बैठकां आयोजन

बेलापूर मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसह बैठकी सूरु

नवी मुंबई : कोंकण शिक्षक मतदारसंघाचे भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघातील शाळांच्या शिक्षकांसह बैठक सत्र सुरू केले आहे. याच अनुषंगाने नेरुळ येथील एसव्ही हायस्कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये बेलापूर मतदारसंघातील 6 शाळांच्या शिक्षकांसह बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी नेरुळ येथील एसव्ही हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, दारावे गाव येथील बाळाराम पाटील विद्यालय, करावे गाव येथील ज्ञानदीप शाळा, सिवूडस येथील गौरव हायस्कुल व ज्युनियर कॉलेज तसेच इतर 2 शाळांच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यावेळी भाजपा महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, नगरसेवक  सुनिल पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे,पांडुरंग आमले, सुहासिनी नायडू, कुणाल महाडिक व मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेच बेलापूर गाव येथील विद्याप्रसारक हायस्कुल या शाळेतील शिक्षकांसह बैठक संपन्न झाली. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष  पंढरीनाथ पाटील,सचिव संदेश पाटील, मुख्याध्यापक दीपक दिवेकर तसेच असंख्य शिक्षक उपस्थित होते. युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मतदान करण्याचे तसेच मतदान करताना कशा पद्धतीने मतदान करावे या संदर्भात सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

 शिक्षकांच्या व्यथा, मागण्या व समस्या जाणून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम करणारे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बेलापूर मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांच्या बैठकी घेत आहोत. मतदान कसे करावे याचे मार्गदर्शनही यावेळी करण्यात येत आहे. भाजपा सरकार शिक्षक वर्ग व संबंधित घटकांचे प्रश्न कायम सोडावीत आले आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रूपाने एक अभ्यासू व शिक्षकांसहित नागरिकांसाठीही अविरत कार्यरत असणारा उमेदवार विधान परिषदेवर प्रचंड मताधिक्याने निवडून जाणार, असाआमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी  व्यक्त केला.

 सर्व शाळांमध्ये बैठकीचे सत्र सुरू असून शिक्षकही सदरबाबत सकारात्मक असून आमचा एकही मत इकडचा तिकडे जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. बेलापूर मतदारसंघातून जास्तीत जास्त आघाडी देण्याचा आमचा मानस असून भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित असून विजयाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा, एक दिवस स्वच्छताकर्मीच्या सन्मानाचा’ महास्वच्छता अभियान