श्री माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

नेरुळमध्ये माघी गणेश जयंतीत भक्तांची अलोट गर्दी   

नवी मुंबई : नेरुळमधील शिरवणे येथील पुरातन स्वयंभू श्री गणेश मंदिरांसह विविध धार्मिक स्थळी माघी गणेश जयंतीत दर्शनासाठी अलोट गर्दी होती.  यावेळी धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन व महाप्रसादा आयोजित करण्यात आले होते .

      प्राचीन काळापासून जागृत देवस्थान असलेल्या शिरवणे गावातील स्वयंभू गणेश मंदिरात  माघी गणेशोत्सव भक्तगणांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माघी गणेश दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती .

    शिरवणे मधील चिंचोली तलावाजवळ असलेल्या पुरातन स्वयंभू गणेश मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले  .

प्रारंभी, स्वयंभू गणेश मंदिरात पहाटे अभिषेक व महापूजा सकाळी प्रतिक शेळके यांचे स्वर नाद भक्ती संध्या भजन तर दुपारी महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला . त्यानंतर गायिका सुप्रिया ठाकुर-घरत ,गव्हाण यांचे तर    शिरवणे येथील वासुदेव सुतार , नंदकुमार सुतार व देवेंद्र पवार बुवा यांचे  सुश्राव्य भजनाचा आनंद भक्तांनी घेतला. यावेळी भाजपचे नवी मुंबई महामंत्री डॉ राजेश पाटील, माजी नगरसेविका माधुरी सुतार यासह ठाणे बेलापूर मधील गणेश भक्तांनी जागृत स्वयंभू गणेशाचे सहपरिवार दर्शन घेतले . माघी गणेश जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव माजी महापौर जयवंत सुतार, अध्यक्ष पंढरीनाथ नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले  . 

       शिवसेना सिवूड्स विभाग प्रमुख समीर बागवान यांच्या पुढाकाराने श्री गणेश मैदान सेक्टर ४८ येथे माघी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला .यावेळी श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर नेरुळ सेक्टर २८ येथील गणेश सोसायटीत माजी उपमहापौर अशोकशेठ गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी सकाळी हभप उत्तम महाराज बढे देवाची आळंदी यांच्या  काल्याचे कीर्तनाचा लाभ भक्तांनी घेतला .दुपारी श्री गणेशाची भव्य पालखी काढण्यात आली.त्यानंतर भक्तासाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता .नेरुळ सेक्टर ८ मधील राजे शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष हेमंत पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माघी गणेश जयंती  सोहळा एल मार्केट प्रांगणात आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या शिस्तीत भक्तांनी गणेशाचे दर्शन घेतले

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोंकण शिक्षक मतदारसंघाचे प्रचारार्थ शाळांच्या शिक्षकांसह बैठकां आयोजन