कोकण विभागातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांचा सन्मान

मतदार नोंदणी व जनजागृतीमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचा सन्मान

ठाणे, दि. 24 (जिमाका) -  मतदार नोंदणी प्रक्रिया व मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोकण विभागातून ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांना उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेतर्फे गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या, दि. २५ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात हा गौरव करण्यात येणार आहे.

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. २५ जानेवारी, २०२३ रोजी १३ वा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, सकाळी ११ वाजता श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या चर्चगेट येथील  पाटकर सभागृहात राज्यस्तरीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये मागील वर्षभरात राज्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्री माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा