ऐरोली-मुलुंड उड्डाणपुलावरील वाहतुकीत बदल

ऐरोली काटई मार्गावरील गर्डर टाकण्याच्या कामासाठी ऐरोली-मुलुंड उड्डाणपुलावरील वाहतुकीत बदल 

नवी मुंबई ः ऐरोली-मुलुंड उड्डाणपुलाच्या सुरुवातीला ऐरोली-काटई या पुलाच्या बांघकामातील ऐरोली मुलुंड वाहिनीवरील पुलाचे गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री ११ ते सकाळी ५ या कालावधीत पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसाच्या कालावधीत रात्रीच्या सुमारास ऐरोली येथून मुंबई, ठाणे, मुलुंडच्या दिशेने जाणारी जड-अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. या कालावधीत जड-अवजड वाहनांची वाहतूक महापे, शिळफाटा, मुंब्रा मार्गे वळविण्यात आली आहे. तर हलक्या वाहनांची दोन्ही मार्गावरील वाहतूक मुलुंड-ऐरोली मार्गावरुन सुरु ठेवण्यात आली आहे.

२४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री ११ ते सकाळी ५ या कालावधीत ऐरोली-काटई या पुलाच्या कामातील ऐरोली-मुलुंड वाहिनीवरील पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहे. या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम निर्विघ्नंपणे पुर्ण व्हावे तसेच नागरिकांना आणि वाहन चालकांना येजा करणे सोयीचे व्हावे यासाठी २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत मुलुंड, ठाणे, मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना पुर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे. यादरम्यान, ऐरोली ब्रीजवरुन मुंबई, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना महापे -शिळफाटा मार्गे मुंब्रा, ठाणे मार्गे इच्छीत स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.


त्याचप्रमाणे या कालावधीत ऐरोली खाडी पुलावरुन मुलुंड, ठाणे, मुंबईकडे जाणाऱ्या दुचाकी, तिनचाकी आणि चार चाकी हलक्या अशा प्रकारच्या वाहनांना देखील पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदर कालावधीत ऐरोली खाडी पुलावरील दोन्ही बाजुच्या मार्गिकांंवरील दुचाकी, तीन चाकी, चारचाकी अशा सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांची वाहतूक मुलुंड-एरोली या एकाच मार्गिकेवरुन सुरु ठेवण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी जारी केली आहे.
दरम्यान, वाहन चालकांनी ऐरोली खाडी पुलावरील वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार आपली वाहने चालवावती, असे आवाहन नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गव्हाण कोळीवाडा, बेलपाडा कोळीवाडा, बोरी कोळीवाडा, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ चॅनेल बंद करून करणार मासेमारी