गव्हाण कोळीवाडा, बेलपाडा कोळीवाडा, बोरी कोळीवाडा, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ चॅनेल बंद करून करणार मासेमारी

महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून जेएनपीटी समुद्र मार्गाचे चॅनेल बंदचे आयोजन

उरण : उरण तालुक्यात जेएनपीटी (जेएनपीए ) प्रकल्प उभे राहताना शेवा कोळीवाडा गावातील जमीन संपादित करण्यात आली. या गावातील ग्रामस्थांचे उरण तालुक्यात नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा येथे पुनर्वसन केले. मात्र या पुनर्वसन गावात म्हणजेच हनुमान कोळीवाडा गावात कोणत्याही मूलभूत सेवा सुविधा नाहीत. सर्वच घरांना वाळवी लागली आहे. हे ठिकाण मानवी वस्तीस राहण्या योग्य नाही. तसेच या ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी जेएनपीटी प्रकल्पला (बंदराला )कवडीमोल भावात दिल्याने उपजीविकेचे कोणतेही साधन या ग्रामस्थांना उरले नाही.शासनाने नोकऱ्याही दिल्या नाहीत.या ग्रामस्थांना शासनातर्फे नोकऱ्याही मिळाले नाहीत. त्यामुळे गेली ३८ वर्षे हनुमान कोळीवाडाचे ग्रामस्थ आपल्या पुनर्वसनासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी प्रशासनासोबत भांडत आहेत.३८ वर्षे केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार करूनही या ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी, ग्रामस्थांनी दिनांक ८/१/२०२३ पासून शेवा कोळीवाडा गावात आपल्या मूळ गावी राहण्यास गेले आहेत. तिथे साफसफाई करून राहण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी गव्हाण कोळीवाडा, बेलपाडा कोळीवाडा,बोरी कोळीवाडा आणि हनुमान कोळीवाडा अशा चार कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी शेवा कोळीवाडा JNPT येथे एकत्र येऊन जे एम बक्षी चे समुद्रामार्गे येणारे जहाज अडवून(चॅनेल बंद करून )त्यादिवसा पासून एकच वेळी मासेमारी करण्याचा ठराव घेतला आहे.महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून हे चॅनेल बंद करण्यात येणार आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल पालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सभागृह उभारण्यात येणार