आधी वायू प्रदुषणाचा विळखा अन्‌ आता ध्वनी प्रदुषणाने बेजार

वायू प्रदुषणासोबतच आता ध्वनी प्रदुषणाचा मारा

वाशी ः वाशी, सेक्टर-२६ परिसरातील नागरिक अधिक वायू प्रदुषणाने भयभीत झाले असतानाच आता याच परिसरात ध्वनी प्रदुषणाने देखील डोके वर काढले आहे. येथील रेल्वे यार्डात सिमेंट भराई मशिनमुळे रात्री-अपरात्री होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे रेल्वे यार्डातून येणाऱ्या आवाज निदान रात्रीच्या वेळी बंद करण्यात यावा, अशी मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे.

वाशी, सेक्टर-२६ येथील रहिवासी भागाला खेटूनच रेल्वे यार्ड आहे. या यार्डात धान्य तसेच इतर तत्सम मालाची चढ-उतार होते. मात्र, मागील दोन-तीन महिन्यांपासून या यार्डात सिमेंट भराईची मशीन बसविण्यात आला आहे. या मशिन द्वारे कंटेनर मधील सिमेंट वाहून टँकर मध्ये भरला जातो. यावेळी सदर सिमेंट भरताना सदर मशीनचा कर्णकर्कश आवाज येतो. सदर मशीन रात्री-अपरात्री देखील सुरु रहात असल्याने जवळच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांची झोप मोड तर होतेच; शिवाय मुलांच्या  अभ्यासावर देखील परिणाम होत आहे.

त्यामुळे आधीच वायू प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या येथील रहिवाशांना आता ध्वनी प्रदुषणाने बेजार केले आहे. त्यामुळे सदर मशीनच्या आवाजावर अंकुश आणावा, अशी मागणी येथील श्रीजी आर्केड सहकारी सोसायटीच्या सदस्यांनी तुर्भे रेल्वे यार्डच्या मुख्य व्यवस्थापकांकडे  केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन