सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हळदी-कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, सिडको यांच्यातर्फे ‘महोत्सव'चे आयोजन

नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदान येथे नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव-२०२३ आयोजित करण्यात आला आहे. या ‘महोत्सव'चे उदघाटन २० जानेवारी रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, माजी नगरसेवक सुनील पाटील, दीपक पवार, शिल्पा कांबळी, बलबीर चौधरी, कमल शर्मा, दत्ता घंगाळे, गोपाळ गायकवाड, संयोजक तथा ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे तसेच शेकडो ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. दरम्यान, कोव्हीड काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावल्याबद्दल महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव'चे आयोजन करण्यात आलेले आहे. ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या वतीने गेली २७ वर्षे समाजपयोगी, शैक्षणिक, सांस्कृतिक, नाट्य, संगीत उपक्रमांचे तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. कोव्हीड  काळातील दोन वर्षाच्या खंडानंतर ‘महोत्सव'चे आयोजन होत असल्याने ‘महोत्सव'च्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्साह पाहून आनंद वाटत आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आधी वायू प्रदुषणाचा विळखा अन्‌ आता ध्वनी प्रदुषणाने बेजार