रोजगार मेळावा हे तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे साधन - मा.आमदार मनोहर भोईर

धुतूम गावातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन

उरण :  एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो हे धुतूम ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.अशा आदर्शवत सरपंच सौ. सुचिता ठाकूर यांचा आदर्श प्रत्येक गाव परिसरातील सरपंचानी अंगीकारणे गरजेचे आहे.असे मत मा.आमदार मनोहर भोईर यांनी व्यक्त केले आहे.

    धुतूम ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून धुतूम गावातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी ( दि२१) केले होते.यावेळी सरपंच सौ. सुचिता ठाकूर यांना शुभेच्छा देताना मा.आमदार मनोहरशेठ भोईर हे बोलत होते.काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करतांना व धुतूम ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ सुचिता ठाकूर यांना शुभेच्छा देताना सांगितले की धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्तांनी देशाच्या उन्नती साधण्यासाठी त्याग केला आहे.अशा प्रकल्पग्रस्तांच्या बेरोजगार तरुण - तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी आज धुतूम ग्रामपंचायत हद्दीत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रकल्पग्रस्तांच्या दुष्टीने अभिमानाची बाब आहे अशा रोजगार मेळाव्यातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल यात तिळमात्र शंका नाही.

    यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाडगांवकर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रेखा पाटील,रायगड जिल्हा परिषद मा सदस्य डॉ मनिष पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विभाग प्रमुख कमळाकर पाटील, उद्योगपती पी.जी.ठाकूर, उद्योगपती नारायणशेठ ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर,प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर,रविनाथ ठाकूर, सुचिता कडू,स्मिता ठाकूर,अनिता ठाकूर,कमळाकर पाटील, काँग्रेस गाव अध्यक्ष शंकर ठाकूर ,माजी सरपंच अमुत ठाकूर, रामनाथ ठाकूर,कुष्णा ठाकूर,शंकर ठाकूर आदिंसह इतर मान्यवरांनी सरपंच सौ सुचिता ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.या रोजगार मेळाव्यात बेरोजगार तरुण - तरुणींनी सहभाग घेतला होता.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हळदी-कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन