१९ जानेवारी नवी मुंबईत हवा गुणवत्तेचा निर्देशांक सर्वाधिक ३९३ नोंद

प्रदुषणात नवी मुंबईची दिल्लीशी स्पर्धा

वाशी ः मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरातील प्रदुषित हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. १९ जानेवारी नवी मुंबईत हवा गुणवत्तेचा निर्देशांक सर्वाधिक ३९३ नोंदवला गेला. तर दिल्लीमध्ये हाच निर्देशांक ३८३ होता. त्यामुळे प्रदुषित हवेत नवी मुंबई दिल्लीला देखील मागे टाकत चालली असल्याने नवी मुंबईकरांची चिंता आणखी वाढली आहे.

नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून वायू प्रदुषणामध्ये मोठी प्रमाणात वाढ होत चालली आहे. या वाढत्या वायू प्रदुषणामुळे हवेची गुणवत्ता रोज खालावत चालली आहे. अशी हवा आरोग्यास हानिकारक असून श्वसन आजाराशी निगडीत रुग्णांना ती अतिधोकादायक आहे, असे तज्ञांचे मत आहे. रात्रीच्या वेळी ‘एमआयडीसी'मधील रासायनिक कारखान्यांमधून रोज प्रदुषित हवा आणि दुषित पाणी सोडली जाते. यावर कारवाई करावी म्हणून वाशी विभागातील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अशा प्रदुषणकारी कारखान्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण मंडळ, नवी मुंबई तर्फे भरारी पथके नेमण्यात आली आहेत. मात्र, सदर पथके नेमकी कुठे भरारी घेत आहेत? असा सवाल रोज वाढणाऱ्या प्रदुषणावरुन दिसत आहे. एकंदरीतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदुषणामुळे नवी मुंबईने दिल्ली शहराला मागे टाकले असल्याने नवी मुंबईकरांची चिंता आणखीनच वाढली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कर्नाळा अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवास संवर्धनाला प्राधान्य देत परिपूर्ण आराखडा तयार