पार्क मधील निर्जीव दगडांवर निसर्ग संवर्धनाचे संदेश देऊन या दगडांना सजीव करण्याचा प्रयत्न

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधील दगड झाले बोलके

उरण ः उजाड माळरानाला एक सुंदर स्वरुप देण्याचे काम उरण परिसरातील सारडे या गावातील ‘सारडे विकास मंच'च्या माध्यमातून देण्यात आले आहे. या उजाड माळरानातील दगडांवर विविध चित्रे काढून सदर परिसर अधिक सुशोभित करण्यात आला आहे. ‘सारडे विकास मंच'चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सदर उद्यान साकार झाले आहे. ‘सारडे विकास मंच'च्या संकल्पनेतून तयार झालेल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे मध्ये मोस्ट कार्ट कंपनीचे मालक सतीश गावंड यांच्या सहकार्याने पार्क मधील निर्जीव दगडांवर अनेक प्राणी, पक्षी विविध प्रकारचे निसर्ग संवर्धनाचे संदेश देऊन या दगडांना सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र साटम आणि त्यांचे सहकारी स्वाती, गणेश, ओमकार यांच्या कलाकारीने सदर दगड जीवंत झाले आहेत. मोस्ट कार्ट कंपनीचे मालक सतीश गावंड यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल अनेक निसर्गप्रेमी आणि पक्षी-प्राणी प्रेमी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लहान मुलांपासून वृध्द देखील सदर कलाविष्कार पाहण्यासाठी गर्दी करु लागले आहेत. अनेक शाळांच्या शैक्षणिक सहली आता ऑक्सिजन पार्क मध्ये आयोजित व्ोÀल्या जात आहेत. भविष्यात कोमनादेवी ऑक्सिजन पार्क एक सुदंर पर्यटन स्थळ व्हावा यासाठी ‘सारडे विकास मंच'च्या सदस्यांमार्फत विशेषत्वाने प्रयत्न केले जात आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ईटीसी केंद्रात मुलांच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बदल दिसून येत असल्याच्या पालकांच्या प्रतिक्रिया