नवी मुंबई शहरात प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी

अनधिकृत बांधकामांवर पांघरुन घालण्यासाठी ‘महापालिका'चे ‘सिडको'कडे बोट ?

वाशी ः नवी मुंबई शहरात प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. मात्र, आता अनधिवृÀत बांधकामांना अधिकचे पांघरुन घालण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन ‘सिडको'कडे बोट दाखवून कारवाई पासून पळ काढीत असल्याचा प्रकार कोपरखैरणे विभागात सुरु आहे.

बोनकोडे गावात सात ते आठ गुंठे जागेवर अनधिकृत बांधकाम सुरु आहे. या अनधिकृत बांधकामावर महापालिका कोपरखैरणे अतिक्रमण विभागाने कारवाई न करता ‘सिडको'ला सदर जागा संरक्षित करण्यासाठी पत्र लिहिले. त्यानंतर ‘सिडको'ने सदर जागेवर कुंपण घातले. मात्र, सदर कुंपण तोडून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु आहे. नवी मुंबई शहरात जागा मालक म्हणून सिडको आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नवी मुंबई महापालिका यांना आपल्या क्षेत्रात विनापरवाना बांधकामावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना १९६६ अन्वये अधिकार आहेत. मात्र, अधिकार असून देखील महापालिका कोपरखैरणे अतिव्रÀमण विभाग ‘सिडको'कडे बोट दाखवून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यापासून पळ काढीत असल्याचा प्रत्यय येत आहे. तर सिडको अधिकारी देखील अनधिवृÀत बांधकामांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पार्क मधील निर्जीव दगडांवर निसर्ग संवर्धनाचे संदेश देऊन या दगडांना सजीव करण्याचा प्रयत्न