बस थांब्यांमध्ये रिक्षांची घुसखोरी
नवी मुंबईतील बस थांबे की रिक्षा स्टॅण्ड?
नवी मुंबई : नवी मुंबईत एन एम एम टी च्या तसेच एस टी, बेस्ट बसगाड्यांसाठी प्रतिक्षा करणाऱ्या नवी मुंबईकर प्रवाशांसाठी असणाऱ्या बस थांब्यांवर रिक्षावाले, अनधिकृत फेरीवाले, भिकारी तसेच खासगी वाहनचालकांनी अतिक्रमण केले असल्याचे पहायला मिळते. रात्रीच्या वेळी तर अनेक ठिकाणी वाहन मालकांनी आपापल्या महागड्या गाड्याही बेलाशकपणे या थांब्यांवर पार्क करुन ठेवलेल्या असतात. यामुळे बस गाडी पकडण्यासाठी जाणाऱ्या गरोदर महिला, वृद्ध प्रवासी, अपंग प्रवासी तसेच लहान शाळकरी मुले-मुली यांना याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. मात्र एन एम एम टी व्यवस्थापन, नवी मुंबई वाहतुक पोलीस यांच्या वतीने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कोणतीच कारवाई केली जात नसल्याबद्दल प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.