कमी विशेषाधिकार असलेल्या शाळांसाठी १०० डेस्कसाठी पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम

रिसायकल केलेल्या कार्टन पॅकेजेसपासून डेस्क निर्मिती

नवी मुंबई ः पुणे विद्यार्थी भवन नेरुळ येथील विद्यार्थ्यांनी सकाळी वर्गात प्रवेश करताच त्यांच ३० नवीन, चमकदार डेस्कने स्वागत केले. सदर डेस्क काही सामान्य नाहीत. या डेस्कसाठी कच्च्या मालाचे योगदान देण्यासाठी रिसायकलिंग मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या शेकडो मुंबईकरांची पर्यावरणविषयक जागरुकता आहे. रिसायकल केलेल्या कार्टन पॅकेजेसपासून बनवलेले डेस्क आहेत. चमचमणारे डेस्क ग्रहावरील प्रेमाने, टेट्रा पॅकद्वारा नेस्ले +, रिलायन्स रिटेल आणि आरयुआर ग्रीनलाईफने संयुक्तरित्या राबविलेल्या कार्टन टू क्लासरुम मोहिमेअंतर्गत शाळेला दान केले आहेत.

रिलायन्स रिटेलचे संचालक व्ही. सुब्रमण्यम यांच्या हस्ते पुणे विद्यार्थी भवन शाळेला डेस्क सुपूर्द करण्यात आले़  शाळेचे प्राचार्य दिनेश पितांबर मिसाळ यांनी शाळेच्या वतीने डेस्क स्वीकारले.  १०,००,००० पेक्षा जास्त टेट्रा पॅक कार्टन्स सारखी वापरलेली पॅकेजेस गोळा करुन ते कमी विशेषाधिकार असलेल्या शाळांसाठी १०० डेस्कसाठी पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने सदर मोहीम चालवली जाते. याआधी २०२२ मध्ये माहीम पोलीस कॉलनी शाळेला ३० डेस्कचे संच दान करण्यात आले.

कार्टन्स टू क्लासरुम मोहीम रिलायन्स रिटेल आणि आरयुआर ग्रीनलाइफ यांच्या सहकार्याने टेट्रा पाकने २०१० मध्ये सुरु केलेल्या गो ग्रीन विथ टेट्रा पॅक या उपक्रमाचा एक भाग आहे. सदर उपक्रम मुंबईतील ५७ रिलायन्स स्मार्ट आणि सहकारी भंडार आउटलेटस्‌ मध्ये मुंबईकरांनी वापरलेले शीतपेयांचे कार्टन्स सोडून जाण्याबाबत प्रोत्साहित करतो. या नंतर सदर कार्टन डेस्क आणि गार्डन बेंचसारख्या उपयुक्त वस्तुंमध्ये पुनर्निर्मित केले जातात. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बस थांब्यांमध्ये रिक्षांची घुसखोरी